कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची जुळवा-जुळव करणे आणि तसेच व्यवसायासाठी लागणारा एकूण खर्च, नोंदणीची फी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च संबंधितास येतो. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो स्व-खर्चाने सुरु करायचा असेल तर तो इतकी मोठी रक्कम सुरुवातीला गुंतवू शकत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला अशा वेळेस एखाद्या महामंडळाच्या योजनेचा लाभ अथवा खाजगी सावकार यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते किंवा बँकेकडून व्यावसाईक कर्ज काढावे लागते.Business Loan Scheme
अशाच प्रकारची महत्त्वाची योजना नवीनव्यवसाय सुरू करण्यासाठी 50 टक्के अनुदान देणार आहे तसेच या योजनेअंतर्गत वीज भांडवल योजनेचे प्रस्ताव सुरू झालेले असून कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला लगेच प्रस्ताव सादर करायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत वेगवेगळ्या समाजाकरिता वेगळे महामंडळ आहे जे ते त्या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यकर्ते तसेच समाजामधून नवीन व्यावसायिक घडवून आणण्यासाठी त्यांना व्यावसायिक कर्ज तसेच अनुदानही उपलब्ध करून देते.
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मिळवण्यासाठी क्लिक करा , व योजनेचा लाभ मिळवा
बीज-भांडवल योजना Business Loan Scheme
जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहेत आणि तुमच्याकडे भांडवल जवळ नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या बीज-भांडवल योजने-अंतर्गत 50 टक्के अनुदान मिळवू शकतात आणि तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या योजनेचे नाव महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत 50 टक्के अनुदान हमखास मिळत आहे. जर आपणास महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ योजनेच्या मार्फत लांब मिळवायचा असेल तर त्या-करिता तुम्हाला तुमचा व्यवसाय प्रस्ताव सादर करावा लागेल आणि 2023-24 या आर्थिक सालासाठी योजनेचे जिल्हा कार्यालय मुंबई उपनगर यांच्या अंतर्गत 50 टक्के अनुदान व बीज भांडवल या दोन्ही योजना राबविण्यात येतात.या योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीयकृत बँका-मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतेच तसेच या योजने-अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती तसेच नव बौद्ध घटकातील अर्जदार हा अर्ज करून लाभ मिळवू शकतो. या योजने-अंतर्गत अर्ज करणाऱ्या तसेच लाभ मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या योजनेत महामंडळाच्या योजने-अंतर्गत लाभ मिळवलेला नसावा.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ योजने अंतर्गत अटी व शर्ती तसेच पात्रता:Business Loan Scheme
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
- वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंतच असावे.
- योजने-अंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये असून जो प्रकल्प तयार केलाआहे त्याच्या निम्मी म्हणजेच 50 टक्के रक्कम अनुदान मिळते. किंवा जास्तीत जास्त दहाच हजार रुपये मिळते. तर उर्वरित मिळणारी अर्जदारास रक्कम बँकेच्या मार्फत मिळते.
- प्रकल्प मर्यादेच्या 20% बीज-भांडवल महामंडळ देते तर
त्यावर ४% व्याजदर दर साल दर शेकडा या नियमा-प्रमाणे आकारण्यात येते. - 75 टक्के भाग भांडवल बँकेच्या मार्फत कर्ज स्वरूपात मिळवता येते तर त्यावर बँक बँकेचे नियमाप्रमाणे व्याजदर आकारते.
- आता उरलेली उर्वरित पाच टक्के रक्कम अर्जदारास स्वतः भरावी लागते
म्हणजेच अर्जदाराचा 5 टक्के सहभाग असतो.
अर्ज कुठे करायचा?
जर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र असाल आणि तुम्हाला तुमचा कर्जाचा प्रस्ताव महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवन, कलानगर, मुंबई उपनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई -51 या कार्यालयात जाऊन सादर करायचा आहे. किंवा या योजनेच्या संदर्भात अधिकृत ऑनलाईन वेबसाईटवरून माहिती घ्या तसेच आणि अधिकृत वेबसाईटवरूनच दिलेल्या ठिकाणीच अर्ज करा.
शेत-तळ्यासाठी आपणास अर्ज करायचा असेल तर , लगेच क्लिक करा व योजनेचा लाभ मिळवा.