Dragon Fruit Farming Subsidy Scheme / Yojana ड्रॅॅगन फ्रुट अनुदान योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो , महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र सरकार असो हे नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा नेहमी विचार करत आलेला आहे , शेतकरी मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना , या योजनेबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीला चालना देण्यासाठी एक महाराष्ट्रातील अग्रगण्य वेबसाईट म्हणजेच महाडीबीटी पोर्टल या पोर्टलवर ही अनुदान योजना सुरू केलेली आहे .

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यास एकरी 64 हजार रुपये अनुदान दिले असून, शासनाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येते की या पोर्टलवर जास्तीत जास्त योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. हा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यास महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो , या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर एकाच अर्जावर शेतकरी अनेक प्रकारचे अर्ज करू शकतो.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी या पोर्टल मार्फत कल्याणकारी योजना दरवर्षी राबवले आहेत , शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा , असे शासनाला वाटते ड्रॅगन फ्रुट हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे , आरोग्यदायी गुणकारी हे फळ असून याला जास्तीत जास्त बाजारपेठ उपलब्ध आहे, त्यासाठी शासनाने या ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी जवळजवळ 60 टक्के अनुदान शेतकऱ्यास या योजना मार्फत मिळते . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यास 64 हजार रुपये एकरी अनुदान दिले जाते .चला तर या योजनेसाठी कसा अर्ज करायचा आपण पाहू.

ड्रॅगन फ्रुट या फळाच्या लागवडीचे फायदे.Dragon Fruit Farming Subsidy Scheme / Yojana

१. ड्रॅगन फ्रुट हे अतिशय पौष्टिक फळ असून शरीरास पोषक आहे.

२. ड्रॅगन फोर्टी लागवड ही कमी पाण्यावर शेतकऱ्यास करता येते , म्हणजेच ठिबक सिंचनही यात फायद्यात ठरते.

३. ड्रॅगन फूड ची लागवड जास्त काळासाठी टिकते.

४. या ड्रॅगन फ्रुट फळाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आहे.

५. औषधी वनस्पती म्हणूनही ओळखले जाते.

ड्रॅगन फ्रुट अनुदान मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

१. अर्जदार शेतकऱ्यांचे नावे जमिनी असली पाहिजे.

२. स्वतः शेतकऱ्याचे आधार कार्ड.

३. आधार लिंक बँक पासबुक.

४. चालू मोबाईल नंबर.

५. लागवडीत आराखडा.

६. शेतकऱ्याचा पासपोर्ट फोटो.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत.

१. सुरुवातीला महाडीबीटी पोर्टल ओपन करा.

२. लॉगिन टॅब वर क्लिक करा.

३. सुरुवातीला आपले युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागतो , अथवा आयडी पासवर्ड तयार असेल तर डायरेक्ट लॉगिनही करू शकता.

४. डाव्या हाताला नवीन अर्ज टॅब वर क्लिक करा.

५. अभियान या टॅब वर क्लिक करा.

६. ड्रॅगन फ्रुट लागवड या योजनेवर क्लिक करा.

७. सर्व आवश्यक माहिती अचूक भरा व नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

Dragon Fruit Farming Subsidy Scheme / Yojana

अर्ज छाननी प्रक्रिया

शेतकऱ्यांना अर्ज सादर केल्यानंतर महाडीबीटीच्या अधिकाऱ्यांकडून अर्जाची पडताळणी केली जाते , नंतर अर्ज पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईलवर अर्ज मंजूर असा मेसेज येतो , मेसेज आल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया ऑनलाइन करायची आहे , म्हणजेच जमिनीचा सातबारा आठ , बँक पासबुक, आधार कार्ड, घोषणापत्र, इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायचे आहेत.

त्यासोबतच रोपे खरेदी केल्याचे बिल ऑनलाइन अपलोड करायचे आहे , सुरुवातीला हे बिल आपल्या सर्व भरून रोपे खरेदी करायचे आहेत नंतर जीएसटी बिल ऑनलाइन सादर करायचे आहे , एवढी प्रोसिजर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर अनुदान जमा होते.Dragon Fruit Farming Subsidy Scheme / Yojana

अर्जासाठी ऑनलाईन लिंक वर क्लिक करा

Leave a Comment

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading