Intercaste Marriage Scheme Maharashtra 2024 आंतरजातीय विवाह अनुदान योजना , महाराष्ट्र शासनाकडून मिळणार तीन लाख रुपये अनुदान.

आंतरजातीय विवाहित जोडप्यांना शासनाकडून मिळणार तीन लाख रुपये अनुदान , मित्रांनो आज आपण आजच्या पोस्टमध्ये आंतरजातीय विवाह कायदा तसेच या योजनेतून कोणत्या जातींचा समावेश होतो , हे अनुदान मिळवण्यासाठी पात्रता , कागदपत्रे , उद्देश्य , योजनेबद्दल माहिती, अनुदान, ऑफलाईन अर्ज अथवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय लागतात, हे सविस्तर पाहणार आहोत.

ntercaste Marriage Scheme Maharashtra 2024
ntercaste Marriage Scheme Maharashtra 2024

Intercaste Marriage Scheme Maharashtra 2024 मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून अशा काही चांगले योजना राबवल्या जातात की , ते सर्वसामान्यांना लवकर माहिती होत नाही , ज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र मध्ये अशी एक योजना आहे की आंतरजातीय विवाह अनुदान योजना , या योजनेमध्ये आंतरजातीय विवाह केल्यामुळे त्या जोडप्यास सामाजिक सुरक्षा तसेच आर्थिक मदतीही मिळते. देशामध्ये समानतेचा अधिकार देणे आणि भेदभाव संपवण्याच्या दृष्टीने मार्ग शासनाकडून या योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. अस्पृश्य निवारण आंतरजातीय विवाह प्रोत्साहन पर अनुदान शासनाकडून विवाहित जोडप्याच्या बँक खात्यावर 50 हजार रुपये रक्कम जमा केली जाते. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडळाकडून दोन लाख तीस हजार आर्थिक सहाय्य दिले जाते , भारतामध्ये भारतीय घटनेने जातीयवाद नष्ट केलेली आहे. ती न पळणाऱ्यास कायद्यामध्ये शिक्षा व दंडाची तरतूद केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून आंतरजातीय विवाह त योजना सुरू करण्याचा उद्देश:

महाराष्ट्र राज्यामध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांमध्ये जातीय भेदभाव दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र या नावाने सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रथम आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास दोन लाख पन्नास हजार रक्कम दिली जाते. आंतरजातीय योजना अंतर्गत ज्या कोण्या जोडप्याचा किंवा जोडीदारांपैकी एक अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , इतर मागासवर्ग यातून असेल तरच त्याला दोन लाख 50 हजार रुपये रक्कम मिळते.

 • महाराष्ट्र शासनाकडून या योजनेत लाभार्थी जोडप्यास ५००००/-रुपये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळामार्फत २५००००/-रक्कम मिळते म्हणजेच संपूर्ण रक्कम तीन लाख रुपये पर्यंत मिळते.
 • आंतरजातीय विवाह योजनेमार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम ही थेट लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक अकाउंट वर म्हणजे डीबीटी मार्फत अकाउंट वर जमा होते.
 • आता या योजनेमार्फत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही व त्याची अट रद्द करण्यात आलेली असून अधिकाधिक समाजातील लोकांनी आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घ्यावा , असे शासनाकडून सांगण्यात येत आहे.
 • तीन लाख रुपये रक्कम यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून 50 टक्के आणि केंद्र शासनाकडून 50 टक्के अशी रक्कम आहे. महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश हा आहे की देशामध्ये जाती भेदभाव नष्ट करून आंतरराष्ट्रीय आंतरजातीय विवाह योजनेत प्रथम देणे.

योजनेबद्दल महत्त्वाची माहिती

योजनेचे नाव आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र शासन 2024
सुरुवात कोणी केली महाराष्ट्र राज्य सरकार
लाभार्थी कोण महाराष्ट्र राज्यातील आंतरजातीय विवाह करणारे म्हणजेच अनुसूचित जाती जमाती.
प्रोत्साहन पर अनुदान महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये तात्काळ मदत
प्रोत्साहन पर अनुदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामंडळ मार्फत दोन लाख 50 हजार रुपये
अधिकृत वेबसाईटambedkarfoundation.nic.in
Intercaste Marriage Scheme Maharashtra

आंतरजातीय योजना यासाठी लागणारी कागदपत्रे , वयोमर्यादा

 • लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 • या जोड्यांपैकी एक दोन अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती , इतर मागासवर्गीय या प्रवर्गातून असावा.
 • पुढे दिलेल्या जाती पैकी लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे विवाहित असलेल्या दाखला असणे आवश्यक आहे.
 • विवाहित जोडप्याचे लग्न करण्यासाठीचे वय म्हणजेच वधूचे वय 18 वय वर्षे पूर्ण असावे , आणि वराचे वय 21 पूर्ण असावे.
 • आंतरजातीय विवाह करण्यासाठी दोघांचे आधार कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत रहिवासी दाखला या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
 • आंतरजातीय विवाह योजनेसाठी म्हणजेच अनुदान मिळण्यासाठी नॅशनल बँकेचे पासबुक व त्यास आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.

या योजने-अंतर्गत दिले जाणारे लाभाचे नियोजन:

1. महाराष्ट्र शासनाकडून या जोडप्यास पन्नास हजार रुपयाची रक्कम त्वरित दिले जाते.

2. केंद्र शासनाकडून दोन लाख 50 हजार रुपये अनुदान दिले जाते.

अर्ज करण्याची पद्धत:

विहित नमुन्यातील अर्ज करण्यासाठी हा अर्ज आपणास जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या ऑफिसमधून घेऊन विवाहित जोडपे यांनी कागदपत्राच्या मूळ प्रती आणि प्रमाणित प्रतिसाद अर्ज प्रत्यक्षात सादर करावा.

आंतरजातीय विवाह योजना यासाठी लागणारे पात्रता व निकष पुढील प्रमाणे:

1. या योजनेचा उद्देश असा की आंतरजातीय विवाह असा विवाह ज्यामध्ये जोडीदारांपैकी एक जोडीदार अनुसूचित जातीचा असेल आणि दुसरा , अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय गैर अनुसूचित जातीचा असावा.

2. विवाह कायद्यानुसार रोहिदासावा आणि हिंदू विवाह कायदा 1955 नुसार रीतसर नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. कायदेशीर रित्या विवाहित आणि वैवाहिक संबंध असल्याचे प्रतिज्ञापत्र या जोडप्यामार्फत सादर करावे.

3. हिंदू विवाह कायदा 1955 नुसार जोडप्याने परिशिष्ट एक नुसार प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

4. महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी एकदाच अनुदान दिले जाते , आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या लग्नासाठी कोणतेही अनुदान दिले जात नाही.

5. असा विवाह झाल्यास किमान एक वर्षाच्या आत मध्ये कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा केले तरच ते एक वर्षाच्या आत मध्ये वैध धरले जाते.

6. कायदेशीर आंतरजातीय विवाह योजनेसाठी प्रति विवाह अडीच लाख रुपये असेल, दहा रुपयांच्या नॉन जोडीशिअल स्टॅम्प पेपरवर पावती मिळाल्यावर पात्र जोडप्याला आरटीजीएस किंवा एन एफ टी द्वारे एक लाख पन्नास हजार रुपये दिले जातील आणि उर्वरित रक्कम फाउंडेशन मध्ये तीन वर्षाच्या कालावधीसाठी मुदत ठेव पावती ठेवली जाते आणि तीन वर्षानंतर ही रक्कम व्याजासहित जोडप्यास दिली जाते.

आंतरजातीय विवाह योजना साठी लागणारे कागदपत्रे:

 • वित नमुना अर्ज.
 • एस सी जातीचे प्रमाणपत्र.
 • ओबीसी/एसटी/ओसी/एनटी/एसबीसी/जात प्रमाणपत्र.
 • हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत झालेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत.
 • हिंदू विवाह कायद्यानुसार म्हणजेच 1955 नुसार अंतर्गत विवाह प्रमाणपत्र आवश्यक.
 • आंतरजातीय विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत सादर करण्याची तारीख आवश्यक.
 • प्रथम विवाह असल्याचे विवाहित जोडप्याचे प्रतिज्ञापत्र अथवा प्रमाणपत्र.
 • जिल्ह्याचे खासदार अथवा तालुक्याचे आमदारांकडून शिफारस पत्र.
 • जिल्ह्याचे जिल्हाधिकारी/दंडाधिकारी/केंद्रशासित प्रदेश सरकार/उपयुक्त/जिल्हा न्यायाधीश दंडाधिकारी/यांनी सादर केलेले शिफारस पत्र आवश्यक.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी लागणारे अर्ज पीडीएफ जीआर खालील प्रमाणे:

१. Intercaste Marriage Scheme Maharashtra Official Website : Click Now This Website

२. आंतरजातीय विवाह अर्ज : https://drive.google.com/file/d/1cOGN7t1szJ59F9LWZZ1Q6CwcmRhoGATn/view?pli=1

धन्यवाद !!!

Leave a Comment

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading