कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र शासनाकडून मिळणार 20 हजार रुपयापर्यंत अनुदान Kadba Kutti Machine

Kadba Kutti Machine

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्टमध्ये कडबा-कुट्टी मशीनसाठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे , तसेच या योजनेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे आणि यासाठी शासकीय अनुदान किती असणार आहे हे सविस्तर पाहणार आहोत.

महाराष्ट्र शासनाकडून आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन ट्रॅक्टर अनुदान पीव्हीसी पाईप अशा अनेक प्रकारच्या अनुदानाच्या योजना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या आहेत , त्यापैकी कडबा कुट्टी मशीन एक शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरलेली आहे , तर आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रकरणासाठी कोणकोणती कागदपत्रे व अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत.

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विविध अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आणलेली असून ती योजना म्हणजे कडबा कुट्टी मशीन योजना , शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि शेतात राबणारे जनावरे यांचा विचार करता त्यांना लागणारा चारा घास व्यवस्थित कापता यावा यासाठी शासनाने कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना सुरू केलेली आहे .

शेतकऱ्यांचे काम हे सहज व तत्परतेने व्हावे यासाठी कडबा कुट्टी यंत्र अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गाय ,म्हशी , शेळ्या किंवा इतर असणारे जनावरे यासाठी चारा कापावा लागतो त्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते , शेतकऱ्यांना जनावरासाठी चारा कापण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते , ती मेहनत कमी करण्यासाठी शासनाने ही महत्त्वाची योजना आणलेली आहे

शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता जनावरांसाठी लागणारा चारा कडबा कुट्टी मशीनच्या साह्याने सुलभतेने कापता यावा व यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ वाचेल हा विचार करून शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन साठी जवळपास 20 हजार रुपयापर्यंत अनुदान अदा केले जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सबसिडी किती असणार आहे?

बाजारपेठेमध्ये या कडबा कुट्टी ची किंमत अंदाजे कमीत कमी १००००/- रुपये पासून ते जवळपास 50 हजार रुपयापर्यंत आहे कडबा कुट्टी मशीन ची किंमत ही शेतकऱ्यांच्या व त्यांच्याकडे असणारे जनावरांच्या क्षमतेमध्ये त्यांना किती स्पीड मध्ये कडबा कुट्टीत चारा कापायचा आहे, त्याप्रमाणे कंपन्यांनी ३ एचपी, ५ एचपी यावर मशीनचे पॉवर कळते. यामध्ये प्रामुख्याने कडबा कुट्टी मॅन्युअल मशीन आणि कडबा कुट्टी ऑटोमॅटिक यांचा समावेश केला आहे , तसेच कंपन्यांनीही शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीत कडबा कुट्टी मशीन बाजारपेठेमध्ये उपलब्ध केलेली आहे. मॅन्युअल मशीन चा अर्थ मनुष्य चलित अवजार तर हे अवजार स्वस्त असते , हे अवजार साधारणतः हाताने फिरवावे लागते. आणि ऑटोमॅटिक मशीन या गोष्टीची किंमत बाजारपेठेत जास्त आहे . या मशीन मध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असते , म्हणून ही कडबा कुट्टी मशीन महाग आहे. तसेच या मशीन साठी शासनाने भरवसा अनुदान उपलब्ध करून दिलेले आहे.

कडबा कुट्टी मशीन या योजनेसाठी अनुसूचित जाती तसेच जमाती महिला मागासवर्ग अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी शासनाने 50 टक्के अनुदान यावर कडबा कुट्टी मशीन दिलेली आहे किंवा 20000 रुपयांपर्यंत अनुदान शासनाकडून मिळत आहे. Chaff Cutter Machine

कडबा कुट्टी मशीन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

१. स्वतः शेतकऱ्याचे आधार कार्ड

२. आधार लिंक नॅशनल बँक पासबुक

३. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.

४. अनुसूचित जाती जमाती यासाठी जातीचा दाखला आवश्यक

५. जमिनीचा आठ अ व सातबारा

६. पद्धतीने निवड झाल्यानंतर – सुरुवातीला कोटेशन , टेस्ट रिपोर्ट , हमीपत्र , करारनामा नंतरच्या

कागदपत्रांमध्ये GST बिल आवश्यक आहे

कडबा कुट्टी योजना मशीन साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

Chaff Cutter Online Application

Leave a Comment

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading