Sanjay Gandhi Niradhar Yojana Update (संजय गांधी निराधार योजना अपडेट

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण-बाळ निवृत्त पेन्शन योजना लागू असणाऱ्या जनतेला हे पैसे आता डीबीटी मार्फत आधार लिंक बँक पासबुक वर मिळणार आहेत, त्यासाठी या लोकांना आपले स्वतःचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावयाचे आहे तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे, हे काम केल्यानंतर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत , आधार ला लिंक केलेला चालू मोबाईल नंबर हे आपल्या गावचे तलाठी कार्यालय अथवा तहसीलदार ऑफिस येथील संजय गांधी निराधार योजना या ऑफिसमध्ये कागदपत्रे जमा करायचे आहेत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आजच्या पोस्टमध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजना या योजनेसंदर्भात महत्त्वाची चर्चा करणार आहोत, जसे की पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेचे पेमेंट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक पासबुक म्हणजे DBT (Direct Bank Transfer) मिळणारी रक्कम अकाउंट वर जमा होत आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाने असा जीआर काढला आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजना या योजनेतही DBT (Direct Bank Transfer) याच पद्धतीने पैसे लोकांच्या अकाउंट वर जमा होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक डीबीटी पोर्टल विकसित केले आहे, त्या पोर्टल चे नाव ” महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ , मुंबई, यांच्यासोबत महत्त्वाचा करार केलेला आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

या योजनेचा लाभ कोणाला मिळतो , यासाठी कागदपत्रे कोण कोणती आहेत?

महाराष्ट्र राज्यामध्ये जी निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना व त्यासाठी किमान त्याचे वय 65 पूर्ण असले पाहिजे, आणि जे निराधार आहेत त्यांच्यासाठी श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजना अशा दोन योजना सुरू करण्यात आलेले असून , त्यांना सुरुवातीला हे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होत होते, परंतु आता महाराष्ट्र शासनाने आधार लिंक बँक अकाउंट वर म्हणजेच डीबीटी योजना याद्वारे पैसे पाठवण्याचे नियोजन चालू आहे ,.

महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र तंत्रज्ञान मुंबई, या सोबत करार केलेला असून या कंपनीने ही डीबीटी पोर्टल विकसित केलेले आहे, तसेच हे पोर्टल विकसित करण्यासाठी शासनाने 34 लाख 68 हजार 703 रुपये, सर्व करा सह दिलेल्या असून याबाबत महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2024 रोजी एक जीआर प्रसिद्ध केलेला आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे खालील प्रमाणे:

1. स्वतःच्या आधार कार्ड (आधार कार्ड अपडेट असावे) मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.

2. नॅशनल बँकेचे पासबुक(पासबुक आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे)

3. स्वतःचा मोबाईल नंबर

हे तीन कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालय अथवा तालुका लेवल असणारे तहसीलदार कार्यालय येथे जमा करावेत.

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ या योजनेचे पैसे डीबीटी द्वारे चेक करण्यासाठी एक वेबसाईट शासनाकडूनप्रसारित करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

Leave a Comment

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading