Vanyaprani Halla Arthsahayya Yojana वन्यप्राणी हल्ला सहाय्य योजना

Vanyaprani Arthsahayya Yojana
Vanyaprani Arthsahayya Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्टमध्ये वन्य प्राणी हल्ला अर्थसाह्य योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत , मित्रांनो या आधी पण केंद्र सरकारने अथवा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणले असून त्यापैकी ही योजना म्हणजेच प्राणी हल्ला अर्थसाह्य योजना होय , बऱ्याच वेळा असे होते की शेतकरी हा जास्तीत जास्त रानामध्ये निवास करत असतो , त्या ठिकाणी हि सर्व प्राण्यांचा वावरही असतो , त्याच्याकडे असणारे पाळीव प्राणी म्हणजेच , गाय , म्हैस, शेळ्या , बैल , कोंबड्या अशा अनेक प्रकारच्या जनावर शेतकरी पाळत असतो , काही वेळा शेतकऱ्यावर हे सर्व प्राण्यांचा हल्ला होतो , हे पाहता शासनाने अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये झाला , तर त्या शेतकऱ्याच्या वारसा आर्थिक मदत दिली जाते.

महाराष्ट्रात अनेक शेतकरी हे डोंगराळ भागात राहत असून , त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा वावर नेहमी असतोच. घटना घडतात की बिबट्या सारखा हिंस्र प्राणी हा शेतकऱ्यावर हल्ला करून शेतकऱ्यांचे बरे वाईट होते , आणि अनेक शेतकऱ्यांना आपला जीव देखील डोक्यात घालावा लागलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये उसाची शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते , त्या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे . त्याचबरोबर बाकीचे प्राणी म्हणजेच लांडगा, कोल्हा, अस्वल हे प्राणी दबा धरून बसलेले असतात . हे प्राणी फक्त शेतकऱ्यांवर हल्ला न करता शेतीची बरेपैकी नासाडी करतात . तसेच इतर प्राणी हे म्हणजे बिबट्यासारखा प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करतो , शेतकऱ्यांना हल्ला करणारा प्राणी हा बिबट्या, रान डुक्कर , लांडगा , तरस हे पण आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश शेतकरी हे ग्रामीण भागात वास्तव्यत असून त्यांची शेती जंगल ठिकाणी आहे . त्या ठिकाणी साहजिकच डोंगरदऱ्या, झाडे झुडपे, मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या ठिकाणी प्राण्यांचा वावर नक्की येतोच , शेतकऱ्यावर जंगली प्राण्यांकडून हल्ला होतो व तो जखमी पण होतो , काही वेळ शेतकऱ्याला मृत्यू सुद्धा येतो. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने वन विभागामार्फत वन्यप्राणी हल्ला अर्थसाह्य योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.

वन्य प्राणी हल्ला अर्थ-सहाय्य योजनेचा मुख्य हेतू काय ?

वन्य प्राणी हल्ल्या अर्थसहाय्य योजना महाराष्ट्र शासनाने केंद्राकडून 2024 साली सुरू झालेली आहे.

  • राज्यातील ज्या शेतकऱ्याचा वन्य प्राणी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असेल किंवा हल्ल्यांमध्ये जखमी झाले असेल त्यांच्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्र शासनाचा मुख्य हेतू आहे.
  • शेतकऱ्याचा वन्यप्राणी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबावर कोणतेही आसमानी संकट नाही येण्यासाठी त्यांना तत्पर आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते.
  • जर शेतकरी या हल्ल्यामध्ये जखमी झाला असेल तर त्यास औषध उपचार घेण्यासाठी चांगल्या दवाखान्याकडे नेणे अथवा इतरांकडे पैसे मागण्याची वेळ न येऊ हा या शासनाच्या हेतू आहे.

वन्य प्राणी अर्थसाह्य योजनेची थोडक्यात माहिती:

१ .योजनेचे नाव : पुण्य प्राणी हल्ला अर्थसहाय योजना महाराष्ट्र शासन.

२. कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य

३. विभागाचे नाव : वन विभाग महाराष्ट्र शासन

४. लाभार्थी: शेतकरी अथवा राज्यातील नागरिक

५. योजनेचा उद्देश : औषध उपचार करण्यासाठी जखमींना त्वरित मदत करणे.

६. लाभाची रक्कम : पंचवीस लाख रुपये

७. अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (सदरचा अर्ज तालुका लेवल असणारे ऑफिस)

वन्य प्राणी हल्ला अर्थसाह्य योजना महाराष्ट्र शासन:

  • महाराष्ट्र शासनाकडून ही योजना 2024 झाली शासनाच्या वन विभागामार्फत सुरू झालेली आहे.
  • महाराष्ट्राच्या मध्ये कोणत्याही नागरिकांचा अथवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर वारस व्यक्तीला 25 लाख रुपये त्या व्यक्तीच्या कुटुंबाला त्वरित देण्यात येतात तसेच व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास जवळपास सात लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम वारसा दिली जाते.
  • शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाला शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासत नाही कारण याचा लाभ मिळवण्यासाठी त्यास ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
  • संबंधित लाभार्थी व्यक्तीला हे रक्कम देण्यासाठी थेट डीबीटी मार्फत बँक अकाउंट वर वितरित केली जाणार आहे, त्यासाठी त्याचे आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करणे आवश्यक आहे .

प्राणी हल्ला अर्थसहाय योजनेच्या नियम व अटी पुढील प्रमाणे:

१. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

२. मृत व्यक्तीच्या वारसाला आर्थिक सहाय्य घेण्यासाठी त्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर वन अधिकारी प्रत्यक्षात येऊन पाणी करून, त्याचा पंचनामा सादर करावा लागतो.

४. अर्ज व्यक्तीच्या वारसाने याआधी या संबंधित कोणतेही शासकीय अनुदान घेतलेले नाही पाहिजे.

यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

१. आधार कार्ड अथवा मतदान कार्ड

२. शिधापत्रिका

३. ग्रामपंचायत रहिवासी दाखला

४. चालू मोबाईल नंबर.

५. पासपोर्ट साईट आकाराचे छायाचित्र.

६. वन अधिकाऱ्याच्या सक्षम दाखला.

७. मृत्यूचा दाखला

८. घटना घडलेली असेल तर पोलीस FIR.

अधिक माहितीसाठी खाली अर्ज व GR उपलब्ध आहे.

१. पुणे प्राणी हल्ला नुकसान भरपाई मिळण्यासाठी चा अर्ज.

२. नुकसान भरपाई चा सरकारचा जीआर .

Leave a Comment

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading