Gopinath Munde Farmer Accident Insurance 2024 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024

Farmer Accident Insurance

नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण आजच्या पोस्ट मध्ये स्व.माननीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याबद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.Gopinath Munde Farmer Accident Insurance 2024

Farmer Accident Insurance महाराष्ट्र राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात (पावसाळ्यात वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे ) या आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, हे अपघात झाल्यावर अनेक शेतकऱ्यास  आपला जीव गमवावा लागलेला आहे , तसेच काही शेतकऱ्यास कायमचे  अपंगत्व आले आसून  अशा  अपघातामुळे शेतकरी घरातील कर्त्या पुरुषावर ओढवलेल्या संकटामुळे त्या व्यक्तीच्या परिवाराचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याशिवाय राहत नाही , असे अचानक संकट आल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासनाने  माननीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना सुरु केली आहे.

शेतकरी कुटुंबातील  प्रमुख व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे  त्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो. अशा अपघातग्रस्त शेतकर्‍यास अथवा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदतीसाठी शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा सन २००५-२००६ या साला-पासून कार्यान्वित केलेली असून सदर योजनेत आता महत्वाचे बदल करण्यात आले असून योजनेचे नाव व मिळणाऱ्या रकमेत मोठा  बदल करण्यात आलेला आहे.Gopinath Munde Farmer Accident Insurance 2024

Farmer Accident Insurance सन २००९-२०१० या साला-पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे , सदरची ही विमा योजना रु.१.०० लाख इतक्या विमा सुरक्षेसह राबविण्यात येत होती. परंतु आता २०१४ साली गोपीनाथ मुंडे साहेब  यांचे निधन झाले आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले,.

मा. गोपीनाथ मुंडे यांचे ग्रामीण भागात आणि विशेष करून  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान होते, त्यामुळे या योजनेचे नाव २०१५-२०१६ ला बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात वीमा योजना असे नाव देण्यात  आले आहे.

सदर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात वीमा योजना या योजनेनुसार विमा सुरक्षेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवून ती २.०० लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास अथवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यास  दोन लाख रुपया पर्यंत महाराष्ट्र शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजने-अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून महत्वाचे सहाय्य करण्यात येते.Gopinath Munde Farmer Accident Insurance 2024

Farmer Accident Insurance शेतकरी अथवा त्यांच्या वारसदारांना समस्या असल्यास तालुका संबंधित भागातील कृषी अधिकाऱ्यांशी किंवा तालुका कृषी अधिकारी यांकडे संपर्क करून  यापूर्वी शेतकर्‍यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने अजून कोणती  वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध नाही, असे स्पष्ट केले असून  गोपीनाथ मुंडे या शेतकरी अपघात विमा योजने-अंतर्गत मिळणारे लाभही स्वतंत्र असतील असेही महाराष्ट्र शासनाने म्हटले आहे.

 महाराष्ट्र राज्यातील  शेतकरी कुटुंबांसाठी ही एक आनंदाची बातमी असून, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. या नवीन बदलामुळे आता ( Farmer Accident Insurance) शेतकरी पत्नीचा बाळंतपणा दरम्यान जरी मृत्यू झाल्यास तिच्या पतीला दोन लाख रुपया पर्यंत मदत मिळणार आहे. या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून  शेतकरी कुटुंबे शेती करत करताना अनेकदा अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागते .

यामध्ये कामाच्या ठिकाणी होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, रस्ते अपघात या आदींचा यात  समावेश आहे. अशा दुर्दैवी घटनेमध्ये घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर मोठा आर्थिक ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली  आहे. या योजनेच्या अंतर्गत आता शासनाने  शेतकरी महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.

Farmer Accident Insurance  नाशिक जिल्ह्यात मागील गेल्या  सात महिन्यांत शेतकरी अपघात विमा योजना  या योजनेअंतर्गत 118 प्रकरणांमध्ये मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जवळपास एक कोटी आठ लाख रुपयांची मदत तात्काळ देण्यात आलेली आहे. यामध्ये बाळंतपण झालेल्या शेतकरी महिलांचाही देखील समावेश आहे,  आता नवीन नियमांनुसार अशा महिलांनाही मदत मिळणार असून  येत्या काळात या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंतर्गत शेतात काम करताना तसेच शेत-शिवारमध्ये सर्पदंशाने मृत्यू झाल्यास/ वीज पडून मृत्यू झाल्यास किंवा इतर कोणत्याही अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना योजनेच्या नियमानुसार आर्थिक मदत केली जाणर आहे,  या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकरी कुटुंबांना कृषी विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र जमा करावी लागतील , तेव्हा ही आर्थिक मदत तत्काळ केली जाईल.Gopinath Munde Farmer Accident Insurance 2024

महाराष्ट्र शासनाच्या या नवीन बदलामुळे शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून , यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याची ताकद मिळेल. या योजनेचा अधिकाधिक लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील व गतिशील राहणार आहे.

सरकारच्या या बदलामुळे होणारे फायदे: Farmer Accident Insurance

  • शेतकरी पत्नीच्या बाळंतपणा दरम्यान मृत्यू झाल्यास तिच्या पतीला आर्थिक आधार मिळन्यास मदत होणार आहे .
  • या योजनेचा लाभ आता मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला वर्गाला मिळणार आहे.
  • यामुळे शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून सावरण्यास महत्वाची मदत होईल.
  • महाराष्ट्र शासनाकडून महिलांच्या कल्याणासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी हा एक सकारात्मक बदल आहे. Farmer Accident Insurance 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading