Vasantrao Naik Loan / Karj Yojana वसंतराव नाईक लोन / कर्ज योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वसंतराव नाईक कर्ज योजनासाठी कागदपत्रे , त्यासाठी असणारी पात्रता , लाभार्थी याबद्दलची सर्व माहिती आजच्या पोस्टमध्ये सविस्तर पाहणार आहोत.

केंद्राकडून तसेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून सर्वसामान्य शेतकरी त्यांच्यासाठी दरवर्षी काही ना काही नवीन योजना आणत असते , त्यापैकी वसंतराव नाईक कर्ज योजना ही असून त्याचे फायदे भरपूर असून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे केंद्र शासनाकडून आणि महाराष्ट्र राज्य शासनाकडून सांगण्यात येत आहे .

वसंतराव नाईक लोन योजना 2024

भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच इतर म्हणजेच देशातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. महाराष्ट्रातील युवक हे बेरोजगार असून त्यांच्यासाठी शासनाने वसंतराव नाईक लोन योजना सुरू केलेली आहे, योजना सुरू करण्याचे ध्येय म्हणजेच युवक हा स्वतःच्या पायावर , उद्योगावर उभा रहावा हाच उद्देश आहे. आपण देशात पाहत आहे की युवकांना नोकरी मिळणे अशक्य आहे त्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवली आहेत .

बेरोजगार युवकांनी आपले स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एखादा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व तसेच त्या उद्योगातून इतरांनाही रोजगाराचे संधी द्यावी , याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये भटक्या विमुक्त जाती , इतर मागासवर्गीय लोक समाविष्ट आहेत.

राज्य शासनाचा मार्फत वसंतराव नाईक महामंडळामार्फत थेट कर्ज लोन योजनेची सुरुवात केलेली आहे. माध्यमातून इच्छुक युवकाला आपला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यांना याच महामंडळ मार्फत म्हणजेच वसंतराव नाईक या योजनेकडून लोन ही दिले जाते. युवक या मार्फत दुसऱ्यालाही रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकतो. वसंतराव नाईक लोन योजनेतून युवकाला किमान एक लाख रुपयाचे लोन वितरित केले जाते. एक लाख रुपये तो आपला व्यवसाय सुरू करू शकतो.

महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील तसेच भटके मुक्त जाती , इतर मागासवर्गीय तरुण ,भटक्या जमाती, यामध्ये लोक जीवन जगत आहेत अशा युवकांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी स्वयंरोजगार निर्मान व्हावा या उद्देशाने महामंडळाकडून एक लाख रुपयाचे कर्ज दिले जाते.Vasantrao Naik Loan / Karj Yojana

या योजनेबद्दल थोडक्यात माहिती

  • योजनेचे नाव -वसंतराव नाईक लोन योजना.
  • विभागाचे नाव-इतर मागास बहुजन कल्याण विभाग.
  • लाभार्थी-महाराष्ट्र राज्यातील रहिवासी.
  • राज्य/प्रदेश-महाराष्ट्र.
  • अर्ज करण्याची पद्धत-ऑनलाइन/ऑफलाइन.
  • एकूण रक्कम-एक लाख रुपये .

वसंतराव नाईक लोन योजना याचा प्रमुख उद्देश

  • महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • वसंतराव नाईक लोन योजना मार्फत बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होऊन राज्यातील इतर बेरोजगार युवकांचे संख्या कमी करणे . व त्यांना या मार्फत काम देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील भटके विमुक्त जाती , इतर मागास प्रवर्ग, दारिद्र्य रेषेखालील प्रवर्ग, या सामाजिक घटकातील लोकांचे प्रगती व्हावी , या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे.
  • वसंतराव नाईक लोन योजना याचा प्रमुख उद्देश म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे व त्यांना सक्षम बनवून आत्मनिर्भर बनवणे.
  • या योजनेमार्फत तरुणांना उद्योगधंद्यासाठी आकर्षित करून , त्यांच्या मार्फ इतर युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे , मागचा प्रमुख उद्देश आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवकांना इतरांकडे पैसे मागण्याची वेळ न येवो , कोणावरही अवलंबून न राहता वसंतराव नाईक योजनेतून कर्ज मिळते. Vasantrao Naik Loan / Karj Yojana

वसंतराव नाईक लोन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

          वसंतराव नाईक लोन योजना 2024 ही महाराष्ट्र राज्य मार्फत सुरू करण्यात आलेले आहे .

  • वसंतराव नाईक महामंडळ योजनेतून राज्यातील बेरोजगार तरुणांना किमान एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज त्वरित मिळू शकते.
  • सदर योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली असून या योजनेचा अर्ज बेरोजगार तरुणांना ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • ही योजना पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे कोणती अडचण येत नाही.
  • अर्जदार हा या योजनेचा फॉर्म स्वतःच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप वरून भरू शकतो.
  • या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणत्याही शासकीय विभागात हेलपाटे मारण्याची गरज अथवा कुठेही पैसे कोणालाही द्यायची गरज भासत नाही.
  • बेरोजगार युवकाचा अर्ज मंजूर केल्यावर सदर मंजूर झालेली रक्कम त्याच्या आधार लिंक बँक अकाउंट वर म्हणजेच डीबीटी मार्फत जमा करण्यात येते.
  • वसंतराव नाईक महामंडळ मार्फत सर्व बेरोजगार युवकांचा आर्थिक माध्यमातून विकास होणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत म्हणजे बेरोजगारांची संख्या ही कमी होईल.
  • महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी शंभर टक्के सहभाग आहे.Vasantrao Naik Loan / Karj Yojana

वसंतराव नाईक लोन योजनेसाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे

१. अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

२. तर व्यक्ती ही भटक्या विमुक्त जाती , विशेष मागासवर्ग प्रवर्गातील, असल्यास या योजनेसाठी पात्र ठरतात.

३. अर्ज व्यक्तीचे वय 18 वर्षे ते 55 दरम्यान असावे.

वसंतराव नाईक लोन योजनेसाठी नियम व अटी

१. सदर योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी तरुणांना दिला जाईल.

२. याआधी या योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

३. या योजनेसाठी अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

४. या योजनेमध्ये कर्ज मंजूर झाल्यानंतर एक लाख रुपये पैकी 75 हजार रुपयांचा पहिला हप्ता डीबीटी स्वरूपात दिला जाईल, तसेच त्यानंतरचा दुसरा हप्ता २५ हजार रुपये प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तीन महिन्यात डीपी मार्फत अकाउंटला जमा होईल. तीन महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर मिळेल.

५. वसंतराव नाईक लोन योजना मंजूर झाल्यानंतर यामध्ये पात्र व्यक्ती असणारी म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा असून या योजनेच्या मार्फत व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे.

६. या योजनेमध्ये पात्र कुटुंबातील एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

७. वसंतराव नाईक लोन योजनेमध्ये किमान दोन जामीनदार असले पाहिजे त्यासाठी शासकीय अथवा निमशासकीय पगारी असावा. Vasantrao Naik Loan / Karj Yojana

वसंतराव नाईक लोन योजनेमध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • ग्रामपंचायत रहिवासी दाखला
  • अन्य प्रवर्गातून असेल तर त्याचा जातीचा दाखला.
  • जन्म प्रमाणपत्र
  • चालू मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासवर्ड साईज फोटो
  • घोषणापत्र
  • जो व्यवसाय सुरू केला आहे त्याचे कोटेशन
  • नॅशनल बँकेचे अकाउंट डिटेल्स

या योजनेअंतर्गत खालील व्यवस्था सुरू करण्यात येऊ शकतात

  • झेरॉक्स
  • संगणक प्रशिक्षण केंद्र
  • सायबर कॅफे
  • कृषी व्यवसाय
  • मत्स्य व्यवसाय
  • स्टेशनरी
  • ब्युटी पार्लर
  • मसाला उद्योग
  • पापड उद्योग
  • मिरची कांडप व्यवसाय
  • भाजी विक्री
  • ऑटो रिक्षा
  • हॉटेल्स
  • ड्राय क्लीनिंग
  • मोबाईल रिपेरिंग
  • ओटो रिपेरिंग वर्कशॉप
  • इलेक्ट्रिक दुकान
  • चिकन शॉप
  • आईस्क्रीम पार्लर
  • किराणा दुकान
  • स्वीट मार्ट

या योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा . आणि त्वरित आपला अर्ज भरून घ्या.

येथे क्लिक करा

Vasantrao Naik Loan / Karj Yojana

Leave a Comment

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading