शेतकरी दादा घ्या लवकरात लवकर पासपोर्ट काढून,कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणार बाहेर देशात फिरण्याची संधी Farmer foreign Tour scheme maharashtra

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणार प्रदेशात फिरण्याची संधी ती ही कृषी विभागामार्फत , आपला भारत देश प्रधान देश म्हणून ओळखला जातो तसेच विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान याची माहिती आपल्या शेतकऱ्यांना अवगत व्हावी यासाठी , महाराष्ट्र राज्य सरकारने प्रथम शेतकऱ्यांसाठी विदेशी दौरा ही योजना आणली आहे.

भारतातील शेतकऱ्यांना विदेशी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी , यासाठी भारत देश प्रयत्नशील असून शेतातील माहिती मिळावी यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना अभ्यासासाठी विदेश दौरा अशी योजना प्रथमत भारतात आणली आहे , भारतातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीची माहिती शेतकऱ्यांना मिळावी आणि त्यांना विदेशात पाठविण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना विदेशात फिरण्यासाठी काही पात्रता व अटी देण्यात आलेले आहेत.

1. भारत देशातील कमीत कमी शेतकरी म्हणजे दरवर्षी 50 शेतकऱ्यांना परदेशात शेती विषयी माहिती मिळवण्यासाठी पाठवले जाणार आहे.

2. या अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी शेतकरी हा किमान बारावी पास पात्र असला पाहिजे.

3. स्वतः शेतकऱ्याला थोडे इंग्रजी ज्ञान असले पाहिजे.

4. ज्या शेतकऱ्याला अभ्यास दौऱ्यासाठी जायचे आहे , त्यासाठी लागणारे पासपोर्ट व त्यासाठी लागणारे काही कागदपत्रे , कृषी विभागाकडे सोपवून आपला पासवर्ड त्यांच्यामार्फत काढून घ्यावा, सुदर पासपोर्टसाठी येणारा खर्च हा महाराष्ट्र शासन करणार आहे.

अभ्यास दौऱ्यासाठी जाण्यासाठी जो खर्च येणार आहे तो महाराष्ट्र शासन देणार असून , या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने फायदा घ्यायचा आहे. देशातील शेतकऱ्याने या अभ्यासासाठी आपले नाव नोंदणी कृषी विभागातील अधिकारी तालुका लेवल ऑफिसला जाऊन करावी. शेतकऱ्याने हा अभ्यास करून आपल्या शेतातील पीक हे कशाप्रकारे उच्च प्रतीचे तयार होईल , हाच अभ्यास करून आपल्या शेतीची प्रगती करावी , हाच हेतू महाराष्ट्र राज्याचा असून सर्वांनी या योजनेत सहभागी व्हावे.

महाराष्ट्र राज्याच्या या अभ्यास दौऱ्यातून काय सिद्ध होणार?

आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणून ओळखला जातोच , तसेच भारत देशातील विविध राज्यात शेती करत असलेले शेतकरी हे आपल्या मालाची प्रत वाढावी , यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दौऱ्यासाठी शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी काही अनुदान देण्याचे ठरवले आहे ते पुढील प्रमाणे-

1. या दौऱ्यामध्ये जो शेतकरी ही ट्रेनिंग घेऊन येईल , अभ्यास परिपूर्ण करून येईल त्यासाठी शासनाने एक लाख रुपये अनुदान घोषित केले आहे.

2. विदेश प्रवास करतात तपशील शेतकऱ्याने महाडीबीटी या संकेतस्थळावर सादर केल्यानंतर त्याचा झालेला सर्व खर्च त्याच्या आधार लिंक बँक अकाउंट वर शासनाकडून अनुदान वितरित केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना ट्रेनिंगसाठी बाहेर देशात जाण्यासाठी निवड पद्धत कशी असणार आहे?

शेतकऱ्याची निवड ही नोंदणी पद्धतीने होणार असून, ही नोंदणी महाडीबीटी या पोर्टलवर असून , त्याची निवड ही लॉटरी पद्धतीने होणार आहे , लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून किमान तीन शेतकऱ्यांची निवड परदेश ट्रेनिंग साठी होणार आहे आणि या तीन शेतकऱ्यांची निवड ग्राह्य धरण्यात येणार आहे.

ट्रेनिंग ला जाण्यासाठी खालील अटी ठेवण्यात आलेल्या आहेत.Farmer foreign Tour For Eligibility

1. अर्जदार शेतकऱ्याचा पासपोर्ट काढलेला असावा .

2. शेतकऱ्याचे नावे आठ व सातबारा उतारा असावा

3. अर्जदार शेतकऱ्यांचे वय किमान 25 ते 60 वयोगटातील असावे.

4. शेतकरी शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा , तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र अर्जासोबत देणे आवश्यक आहे.

5. स्वतः शेतकरी या खाजगी अथवा शासकीय नोकरी नसावा.

या पाच अटी शासनाने ठेवलेले आहेत , महाराष्ट्र शासन दरवर्षी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे . त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनीही अशाच योजनेचा लाभ घ्यावा . व आपल्या शेताची भरभराट कशी होईल यादृष्टीने सर्व योजना राबवाव्यात.

Leave a Comment

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading