PM Gramin Awas Yojana 2023 प्रधान-मंत्री ग्रामीण आवास योजना

PM Gramin Awas Yojana 2023  For PMAY-G

PMAY Pradhan Mantri (PM) Gramin Awas Yojana 2023 Now Online Apply प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2023 आजच करा ऑनलाइन अर्ज करा.

PM Awas Yojana
PM Awas Yojana

आजही आपल्या भारत देशामध्ये असे अनेक नागरिक आहेत की, ते बेघर आहेत ज्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:चे घर बांधू शकत नाही आणि जुन्या घराचीही दुरुस्ती करून घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू केली असून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये ग्रामीण आवास योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना घरांची दुरुस्ती व नवीन घर बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही शासनाची आर्थिक मदत फक्त १ लाख २० हजार रु. आणि डोंगराळ भागासाठी १ लाख ३० हजार रु आहे. या महत्वाच्या लेखामधून ,  आम्ही तुम्हाला आज PMAY ग्रामीण योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

ही योजना कोणासाठी असेल ?   Pradhanmantri Gramin awas Yojana

आसाम राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा व केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह यांनी 20 मे 2022 रोजी आसाममधील 5 लाख नागरिकांना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 12 लाभार्थ्यांना स्वी-कृती पत्रही देण्यात आलेले आहे. या योजनेच्या अंतर्गत घरे देण्याची प्रक्रिया जोरहाट या गावामधून सुरू करण्यात येणार असून ती संपूर्ण राज्यात राबविली जाईल ही माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

2014 मध्ये केंद्र सरकारने आसाम राज्यासाठी 27 हजार  कोटी रुपयांच्या आर्थिक खर्चासह 19 लाख घरे मंजूर केलेली होती. त्यापैकी सात लाख घरे बांधकामाच्या विविध टप्प्यात असून आणखी 5 लाख घरांचे बांधकाम 20 मे 2022 पासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये 7739.50 कोटी रुपयांच्या आर्थिक गुंतवणुकीचा समावेश केला आहे. लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून 1657.50 कोटी रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली. जोरहाट जिल्ह्यातील एकूण 12000 लाभार्थ्यांपैकी 4000 लाभार्थी पात्र आहेत.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना यामध्ये एकूण खर्च किती असेल?Pm Gramin Awas Yojana  

८ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने Pm Gramin Awas Yojana  ही पुढील 3 वर्षांसाठी सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आता ग्रामीण भागात राहणाऱ्या उर्वरित पात्र नागरिकांना या योजनेमार्फत पक्की घरे बांधून मिळणार आहेत.  विस्तार केल्यानंतरच पुढील उर्वरित 155.75 लाख पक्की घरे बांधली जाणार आहेत. त्यामुळे २.९५ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट गाठण्यात मदत महत्त्वपूर्ण ठरणार असून . देशभरात एकूण 155.75 लाख घरे बांधण्यासाठी भारत सरकार 198581 कोटी रुपये एवढे खर्च करणार आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना यादी 2023 तपासण्यासाठी सरकारने ऑनलाईनची पद्धत उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या लोकांनी  पीएम ग्रामीण आवास योजना नोंदणी फॉर्म भरला आहे ते त्यांचे नाव या यादीतून ऑनलाइन तपासू शकता. पीएम ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून 2023 पर्यंत भारत देशातील सर्व राज्यातील जनतेला 1 कोटी पक्की घरे देण्याची तरतूद भारत सरकारने केली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच इतर कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या महिला, मध्यम उत्पन्न गट वज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असून असे लोक पीएम ग्रामीण आवास योजना गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करू शकतात.

2011 च्या भारतीय जनगणनेच्या आधारे PMAY साठी लोकांची निवड केली जाईल व सरकारने दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. PMAY ग्रामीणयादीशी संबंधित अधिक माहिती जसे- प्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना यादी ऑनलाईन कशी तपासायचीतसेच  योजनेशी संबंधित कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात , इत्यादी सर्व माहिती आज या लेखात दिली आहे.

Pradhan Mantri  Gramin Awas Yojana

आपणा सर्वांना माहीत आहे की, ग्रामीण आवास योजना केंद्र-द्वारे चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच 29 मार्च 2022 रोजी मध्य प्रदेश मधील 5.21 लाख घरांचा हाऊस वॉर्मिंग समारंभ आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते आभासी माध्यमातून केला गेला आहे. या-शिवाय यानिमित्ताने महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांना फुले, दिवे व रांगोळीने सजवण्यात येणार आहेत. या योजनेमार्फत आतापर्यंत भारत देशातील 24.10 लाख पक्के घरे बांधण्यात आली असून त्यामध्ये प्रामुख्याने 2021-22 मध्ये 5.41 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत. ही योजना 1 एप्रिल 2016 रोजी ग्रामीणविकास मंत्रालयाने सुरू केली असून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमधून घर बांधण्यासाठी लाभार्थ्याला  120000 ते 130000 रु.पर्यंतची ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये बँक खात्यावर जमा केली जाते.

येथून भरा ऑनलाईन अर्ज

रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर या लिंक वर क्लिक करा.

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading