Animal Husbundry Scheme/Yojana संकरीत दुधाळ गाय, म्हैस-गट वाटप योजनेसाठी महाराष्ट्र शासनाची मंजुरी शासन निर्णय आला फक्त याच लोकांना मिळणार लाभ

Animal Husbundry Scheme/Yojana संकरीत दुधाळ गाय, म्हैस-गट वाटप योजनेसाठी महाराष्ट्र शासनाची मंजुरी: शासन निर्णय आला

गाय आणि म्हैस-गट वाटप योजना 2023 चला तर घ्या संपूर्ण माहिती जाणून:नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी गाय आणि म्हैस गट वाटप योजना याबद्दल माहिती या पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत.ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा व पुढे शेअर करा.

Animal Husbundry Scheme/Yojana या शासनाच्या योजनेच्या अंतर्गत महिला बचत गट,अल्प-भूधारक शेती असणारे शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्ग यांना या योजनेमध्ये प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे व घेता येणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेली असून या योजनेच्या अंतर्गत संकरित आणि देशी गाई यांचे वाटप होणार आहे.

गाई आणि म्हैस-गट वाटप योजना 2023 अर्ज कुठे आणि कशा पद्धतीने करावा?

 1. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची www.Ah.Mahabms.Comहे ऑनलाईन शासनाचे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल अँप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
 2. आता त्यामुळे अर्जदारास अर्ज करण्यासाठी AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल अथवा प्ले-स्टोअरवरुनच डाऊनलोड करावे.
 3. आपल्या मोबाइल मध्ये सन 2021-24 मध्ये AH-MAHABMS मोबाइल App डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल-प्ले किंवा स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे.
 4. अर्जदारांनी अर्ज ऑनलाईन करता वेळी त्यांनी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक आणि बिनचूक
  भरणे बंधनकारक आहे , अर्ज चुकल्यास अर्ज बाद होऊ शकतो .
 5. वेबसाईटवर दिलेल्या सर्व रकान्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडणे ही जवाबदारी सर्वस्वी स्वतः अर्जदाराची राहील.
 6. एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट झाल्यानंतरनंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात कोणताही बदल करता येत नाही.

संकरीत गाई आणि म्हैस-गट वाटप योजना 2023 मुख्यतः लाभ कोण घेऊ

शकतो ?

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे , या कार्य-क्षेत्रातील रहिवाशी असणारे व्यक्तींना ही योजना लागू होत नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातीलच रहिवाशाना  या योजनेचा लाभ घेता येत आहे.

Animal Husbundry Scheme/Yojana अर्जदारास लाभ देण्याच्या अटी कोणत्या?

सन 2022-23 मधील अर्जदार लाभार्थीला देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक व उपलब्ध निधीच्या अधिन राहूनच लाभ देण्यात येईल याची कृपया लाभार्थ्याने नोंद घ्यावी.

 • संकरित गाई आणि म्हैस-गट वाटप या योजनेची कार्यप्रक्रिया काय आहे?
 • अर्जदाराच्या नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही दिवसां पुरतीच स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येईल.
 • या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी “QP-EVDTEC” या नावाने आणि Text SMS दिलेल्या मोबाइलवर अथवा E-Mail वर प्राप्त होतील. तसेच प्रणालीवरही सूचना देण्यात येतील.
 • या योजनेच्या मार्फत अंतिम निवड झाल्यासं संबंधित शेतकऱ्याने बंधपत्र हे शासकीय कार्यालयात देणे
  बंधनकारक राहील.

 

आम्ही या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे. आपण हा लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर करा याबद्दल आपणास अद्याप काय शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या टोलफ्री नंबरवर संपर्क करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. महाराष्ट्र शासनाच्या या योजना संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण योजनेचा तपशील व वेळापत्रक पहावे.

एकूण संकरीत गाय व म्हैस गटाच्या किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वतः हिस्सा खालील-प्रमाणे राहील.

सदरची योजनाही महाराष्ट्र राज्यात उपरोक्त-प्रमाणे सुधारित किमतीनुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून राबविण्यात आली असून या शासकीय योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थीस प्रत्येकी 02 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करण्यात येईल. आणि ज्यामध्ये गाय गटासाठी 75 टक्के अनुदान म्हणजेच रु. १,१७,६३८ /- रुपये किंवा म्हैस गटासाठी रु. १,३४,४४३/- शासकीय अनुदान हे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार देय राहील.मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित 25% रक्कम ही लाभार्थ्यास स्वतः भरावी लागेल किंवा बँक/वित्तीय-संस्थेकडून कर्ज(Loan)घेणाऱ्या(5टक्के लाभार्थी हिस्सा व 20 टक्के ठरलेले बँकेचे कर्ज) याप्रमाणे लाभार्थ्यास योजना-अंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.

 Animal Husbundary Scheme / Yojanaतपशील   

 

 २ देशी /२ संकरीत गायीच्या

एका गटासाठी देय ७५ टक्के

अनुदान

  

 

 २ म्हशीच्या एका

गटासाठी देय ७५ टक्के

अनुदान

2  जनावरांच्या एका गटाची किंमत (प्रति गाय रु. 70,000/- व प्रति म्हैस रु. 80,000/- याप्रमाणे रु.1,05,000 रु. 1,20,000/-
जनावरांच्या किमतीला अनुसरून कमाल 10.20 टक्के (अधिक 18 टक्के
सेवा-कर) दराने दर 3 वर्षाचा विमा उतरविणे.
रु. 13,628/- रु. 14,443/-
प्रतिगट एकूण देय अनुदान रु. 1,17,668/- रु.1,34,400/-

Animal Husbundry Scheme / Yojana अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे –

 • फोटो असलेल्या ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
 • शेतजमीन सातबारा उतारा (अनिवार्य)
 • 8 अ चा उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्व-घोषणा पत्र
 • आधारकार्ड ओळखपत्र (अनिवार्य )
 • 7/12 मध्ये स्वतः लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती-पत्र आवश्यक, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारपत्र आवश्यक (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचीत जाती /जमाती असल्यास त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत असणे आवश्यक (असल्यास अनिवार्य)
 • रहिवासी दाखला (असल्यास अनिवार्य )
 • दारिद्र्य रेषेखालील असल्यासं ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • बँक खाते पासबुक (असल्यासअनिवार्य)
 • राशनकार्ड (एकाच कुटूंबातील फक्त एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग व्यक्ती असल्यास दाखला-सरकारी दवाखाना दाखला (असल्यास अनिवार्य )
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे मार्फत प्रमाणपत्र अथवा बचत गटाच्या बँक पासबुकाची
  पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वयाचा– जन्म-तारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • रोजगार ,स्व-यंरोजगारकार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत असावी.
 • प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

महाराष्ट्र शासन निर्णय संकरीत दुधाळ गायी किंवा म्हशींचे गट वाटप योजना:

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी 6/4/2 दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजने-अंतर्गत सदर योजनेस दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने दूध उत्पादनास चालना देण्यासाठी 6/4/2 संकरित गाई किंवा म्हशींचे गट वाटप करणे या नावीन्यपूर्ण योजना ही राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजने-अंतर्गत दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी मंजुरी देण्यात आली. या महाराष्ट्र शासनच्या निर्णयानुसार राज्यात दुग्धोत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत वाटप करावयाच्या 6/4/2 संकरित गाई किंवा मशीनचे वाटप या योजनेमध्ये दुधाळ गाईंच्या यामध्ये गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी ,थारपारकर ,देवणी, लाल कंधारी,गवळाऊ व डांगी मुख्यतः या जातींचा  समावेश करण्यात आलेला आहे.

शासनाचा अत्यंत महत्वाचा GR

ऑनलाईन अर्जासाठी लिंक

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading