MAHADBT महाराष्ट्र राज्य नमो शेततळे योजना 2024

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता आपल्या राज्य-शासनाकडून नमो शेततळे योजना राबविण्यात येणार, जवळपास 7300 नवीन शेततळ्यांना मंजुरी Mahadbt

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण आजच्या पोस्ट मध्ये नमो शेततळे योजना या विषयी माहिती तसेच योजनेची वैशिट्य व शासनाने कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते, आज आपण नमो शेततळे योजना याबद्दल सविस्तर माहिती या लेखात सविस्तर पाहणार आहोत .

महाराष्ट्र राज्याचा शेतकरी हा संपूर्ण देशचा पोशिंदा समजला जातो. कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना दरवर्षी राबविले जातात. तसेच सिंचनाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी-सिंचन योजना व अनेक प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. शेतीचा विकास होण्यासाठी पाण्याची उपलब्धता असणे  अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्र शासनाने हीच बाब लक्षात घेता आता जुन्या योजनेत भर घालून एक नवीन योजना सुरू केली आहे. ती योजना म्हणजे नमो शेततळे योजना किंवा अभियान होय. mahadbt

नमो शेततळे योजना महाराष्ट्र शासन : mahadbt

आपल्या भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 73 व्या वाढदिवस निमित्ताने अकरा चतु-सुत्री कार्यक्रम राबविण्यात आला असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा नमो शेततळे योजना अभियान अशी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जवळपास 7300 नवीन शेततळ्यांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. तसेच आपले आपले महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या माध्यमातून  मागेल त्याला शेततळे योजना या घटका-अंतर्गत जे शेततळे उभारले जातील, त्यांचा सुद्धा नमो शेततळे या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे ,असे सांगितले आहे.Mahadbt

महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी या योजना-अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेततळे योजनेसाठी जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, त्या निधीमधून नमो शेततळे योजना देखील राबविण्यात येईल असे प्रतिपादन करण्यात आले. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्याअ सर्व अटी, नियम व सूचना नमो शेततळे योजनेसाठी कायम असणार आहेत.असे शासनाच्या GR मध्ये सांगण्यात आले आहे.

योजनेचे नाव                              : नमो शेततळे योजना
योजनेची सुरुवात                       : 17 सप्टेंबर 2023
विभाग                                       : कृषी विभाग (महाराष्ट्र राज्य)
लाभार्थी                                     : सर्व लहान-मोठे शेतकरी वर्ग
अर्ज करण्याची प्रक्रिया                :  ऑनलाईन
शासनाचे अधिकृत संकेतस्थळ     : महाडीबीटी शेतकरी पोर्टल

     नमो योजनेंतर्गत शेततळे बनवण्यासाठी अटी व नियम : mahadbt

  • नमो योजनेंतर्गत शेततळे बांधणी आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित शेतकऱ्यास संपूर्ण कामाची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात करणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या कामासाठी कोणतेही इतर आगाऊ पैसे दिले जात नाहीत.
  • नमो योजनेंतर्गत शेततळ्याच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी संपूर्णपणे लाभार्थी स्वतः जबाबदार असेल.
  • हे शेततळे पूर्ण झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद करणे शेतकऱ्यास अनिवार्य आहे.
  • नमो योजनेंतर्गत शेततळे पूर्ण झाल्यानंतर स्वतः शेतकऱ्याने स्वखर्चाने शेततळे योजनेचा बोर्ड लावने बंधनकारक आहे.
  • गरज पडल्यास स्वतः लाभार्थी शेतकऱ्यास प्लास्टिक अस्तरीचा वापर स्वखर्चातून करावा लागतो.
  • शेताच्या बांधावर झाडाची लागवड करणे अनिवार्य आहे.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाल्यास भरपाई मिळत नाही.

नमो शेततळे योजनेच महत्वाचा  शासन निर्णय (GR)Mahadbt

महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेततळे योजना संदर्भातील महत्त्वपूर्ण जी.आर. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आला असून. सदरचा शासन निर्णयाचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, महाराष्ट्र राज्यातील ८२ % शेती ही कोरडवाहू असून, ती सर्वस्व पाण्यावर म्हणजेच पडणाऱ्या पावसावर अवलंबून असून महाराष्ट्र राज्यातील विविध भागात कमी पडणारा पाऊस व इतर अडचणी लक्षात घेता शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हे सरकारच्या लक्षात आले , व अशा योजना महाराष्ट्र राज्यात राबवणे अत्यावश्यक आहे.

शेततळ्याचे उपलब्धता करून दिल्यास व या योजनेत शेतकऱ्यांना मदत केल्यास शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध होतील व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेलच या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेततळे अभियान  ही योजना राबविण्याचे धोरण महाराष्ट्र राज्य-सरकारचे होते.Mahadbt

नमो शेततळे योजनेचा महत्वाचा GR

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading