महाराष्ट्र शासनाकडून मनरेगा योजने-अंतर्गत सिंचन वहीर खोदुन देण्यात येत असून त्यासाठी शासन
शेतकऱ्यास ४ लाख रुपये अनुदान थेट आधारलिंक बँक खात्यावर जमा होते.
या लेखात आज आपण पहाणार आहोत कि ,सिंचन विहीर अनुदान मिळवण्यासाठी किती अनुदान मिळते , यासाठी पात्रता ,कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत , हे पाहणार आहोत
आपणास लेख आवडल्यास शेवटपर्यंत वाचा व पुढे नक्की शेअर करा.
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
१. मनरेगा जॉब कार्डची प्रत.
२. ८ अ / ७.१२ चा ऑनलाईन डिजिटल उतारा.
३. सामायिक गट विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० आर (हेक्टर) जमीन असल्यास पंचनामा आवश्यक आहे.
४. सामायिक विहीर असल्यावर चारा व पाणी वापरा-बाबत सर्व लाभार्थी गटातील शेतकऱ्यांचे करार-पत्र आवश्यक आहे.
सिंचन विहिरीसाठी लाभ-धारकाची निवड
मनरेगा योजनेच्या तरतुदीत खालील प्रवर्गासाठी सिंचन विहिरीचे काम मिळते.
१. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२. भटक्या विमुक्त जाती.
३. अनुसूचित जाती
४. अनुसूचित जमाती
५. इंदिराआवास योजनेतील लाभार्थी
६. अल्पभूधारक शेतकरी
७. सीमांत शेतकरी जमीन सुधारणांचे लाभार्थी
८. स्री-कर्ता लाभार्थी
९. निरधीसूचित जमाती
विहिरीची खोदाई कुठे करावी
१. दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात किंवा नाल्यांचा संगम तेथेमातीचा किमान ३० सेंटीमीटर पर्यंत थर किमान व ५ मीटर खोलीपर्यंत मऊ भिजलेला खडकआढळतो तिथे.
2. नदी अथवा नाल्याचा उथळ गाळाच्या क्षेत्रामध्ये.
३. जमिनीच्या सखल भागात कि जेथे किमान ३० सेंटीमीटर पर्यंत थर किमान ५ मीटर खोलीपर्यंत मुरूम आढळतो.
४. नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे. परंतु तिथे चिकन माती नसावी.
५. जेथे नदी नाल्याचा जुना प्रवाह होता, प्रांत आता नाही, त्या ठिकाणी सुद्धा विहीर घेता येते.
६. अचानक गरम जागा असणाऱ्या भागात
विहीर कुठे खोदु नये
१. भू – पृष्ठावर खडक असल्यास.
२. डोंगराच्या कडा आणि आसपासच्या १५० मीटरच्या अंतरात
३. मातीचा थर हा ३० सेंटीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या भू-भागात
४. मुरमाची खोली हि ५ मीटरपेक्षा कमी असणाऱ्या भू-भागात
लाभार्थी पात्रता पुढीलप्रमाणे
१. स्वतः लाभधारकाकडे०.४० आर जमीन असावे.
२. महाराष्ट्र शासन भूजल अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वात असणाऱ्या पेयजल
स्रोताच्या ५०० मीटरच्या परिसरात नवीन विहीर घेण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलेले असून त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहीर , कुपनलिका घेऊ नये.
३. लाभ-धारकाच्या ७/१२ उताऱ्यावर विहिरीची नोंद असू नये.
४. लाभधारकाकडे एकूणक्षेत्राचा दाखला असावा.
५. दोन सिंचन विहिरीमध्ये १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहत नाही.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सिंचन विहिरी मंजूर करताना खाजगी विहीर पासून १५० मीटर अंतराची अट लागू राहत नाही.
अर्ज करण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे