Sheli Palan Yojana पंचायत समिती मार्फत 100 शेळ्या 10 बोकड योजना गट वाटप सुरू

sheli palan yojana
sheli palan yojana

आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शेळी पालन योजना २०२२-२३ (शेळी पालन योजना) या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे पाहणार आहोत. महाराष्ट्रात शेळीपालन अनुदान योजना ही पंचायत समिती स्तरावर आहे. महाराष्ट्र राज्यासाठीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा? शेळीपालन अनुदान योजना शेळीपालन बँक कर्ज कसे मिळवायचे याबद्दल चर्चा केली जाईल आणि कृपया खाली दिलेली सर्व माहिती वाचून व आपल्या सहकारी शेतकर्‍यांना ही माहिती द्या.

१. सदर योजना या आर्थिक वर्षामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात लागू केली जाणार नाही.

२. शेळी पालन या योजनेमार्फत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादी व संगमनेरी शेळ्या आणि बोकडांचे गट वितरित केले जातील.

३.शेळी पालन या योजनेमार्फत, विदर्भातील शेळ्या व बोकडांच्या स्थानिक जातींचे गट जे स्थानिक हवामानाला तोंड देऊ शकतील असे.

  • लाभार्थी निवड निकष (शेळी पालन योजना)

    १. लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखालील असावा.

२. शेतकरी हा अल्प भू-धारक असावा

३. सुशिक्षित बेरोजगार

४. महिला बचत गटातील लाभार्थी (संख्या 1 ते 4)

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे

१. लाभार्थीचे आधार कार्ड व पॅन कार्ड.

२. ८ अ आणि सातबारा

३. ग्रामपंचायत रहिवाशी प्रमाणपत्र.

४. शेळीपालन प्रशिक्षण घेतले आहे असा पुरावा म्हणून प्रमाणपत्र (अनुभवासाठी)

लाभार्थीचे  पासपोर्ट साईज फोटो आणि प्रकल्प आहवाल असावा.

वरील ही सर्व कागदपत्रे  स्वतः लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक असणार आहे.

शेळी पालन हे स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र  राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेळीपालन योजना २०२२ ? आता मुख्य म्हणजे महाराष्ट्र सरकारनेही शेळीपालन या योजनेसाठी अनुदान जाहीर केले असून एका गटातील किंमत खालीलप्रमाणे आहे.

4 शेळ्यांचे व्यवस्थापन हे स्वतः लाभार्थ्याने करणे अपेक्षित आहे. एकूण किंमत 1,03,500/- (उस्मानाबादी शेळी  जातीसाठी आणि संगमनेरी शेली जातीसाठी) 78,231/-

ऑनलाईन अर्जासाठी लिंक

http://mahamesh.co.in/

 

 

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading