Ujjwala Gas Yojana 2023 उज्वला गॅस योजना २०२३

Ujjwala Gas Yojana 2023 राज्यसरकार मार्फत मिळणार ५०० रुपयात घरगुती गॅस सिलिंडर

Ujjwala Gas Yojana 2024
Ujjwala Gas Yojana 2024

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण आजच्या पोस्टमध्ये उज्वला गॅस योजना या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत , तर मित्रांनो आपण यात कोणती व्यक्ती पात्र असणार आहेत व यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत , हे सविस्तर पाहणार आहोत . हा लेख आवडल्यास नक्की वाचा व पुढे शेअर करा.

आता राज्यसरकार मार्फत ५०० रुपयात घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे. परंतु त्याआधी करावे लागेल हे महत्ताचे काम :गेल्या काही महिन्यापासून घरगुती वापराचा गॅस सिलिंडर किंमत  दिवसेंदिवस वाढत चालली आहे.व यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन जगणे कठीण झाले आहे,गॅस सिलिंडरची सबसिडी मिळते कि नाही,असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परंतु राज्य सरकारने यावर तोडगा काढून ५०० रुपये मध्ये गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्यसरकारने याआधी गॅस सबसिडी पूर्णतः बंद केली होती , यावर आता सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासादायक बातमी दिली आहे, ती म्हणजे गॅस सिलिंडर ५०० रुपयात परंतु ही योजना सर्वांसाठी लागू नाही .

 राज्यसरकारने यामध्ये मुख्यतः बी.पी.एल. कुटुंब व पंतप्रधान उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी यांनाच या योजनेचा लाभ होईल , यामध्ये मात्र राजस्थान सरकारने मुख्यमंत्री गॅस  सिलिंडर या योजनेंतर्गत गरीब व उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी यांनाच ५०० रुपयात गॅस सिलिंडर देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.तसेच  बी.पी.एल. कनेक्शन असणाऱ्या व्यक्तीच्या नावे ६१० रुपये अनुदान व उज्वला योजनेंतर्गत कनेक्शन असणारे व्यक्तीच्या नावे ४१० रुपये जमा होतील, आता राज्यसरकारच्या तिजोरीवर वर्षाला ७५० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. राज्यसरकारने केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय यांकडून बी.पी.एल.व उज्वला कनेक्शनयोजनेची यादी मागवली आहे. हि यादी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल . संबंधित व्यक्तीला त्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करणे गरजेचे आहे. लिंक नसेल तर सबसिडी जमा होणार नाही. सदरची योजना १ एप्रिल पासून सुरु झाली आहे ,तसेच आता राजस्थान प्रमाणे इतरही राज्यांमध्ये या योजनेबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.Ujjwala Gas Yojana 2023

 

उज्वला योजनेअंतर्गत कनेक्शन घेण्यासाठी पात्रता पुढीलप्रमाणे:

१. अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.

२. अर्जदार महिलेच्या घरात कोणत्याही व्यक्तीच्या नावे सुरुवातीला एलपीजी कनेक्शन घेतलेले नसावे.

३. या योजनेमध्ये अनुसूचित जाती, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय स्त्रिया, अंत्योदय अन्न योजना, इत्यादी प्रवर्गातील गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.

उज्वला योजना साठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

१. आधार कार्ड.

२. पत्त्याचा पुरावा म्हणून, मतदान कार्ड ,आधार कार्ड, लाईट बिल, नॅशनल बँकेचे पासबुक किंवा इतर शासकीय ओळखपत्र.

३. बँकेचे पासबुक तसेच त्यावर असणारा आयएफसी कोड आवश्यक.

४. कुटुंबाची आर्थिक स्थिती दर्शवणारा केवायसी असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्जदार व्यक्ती संबंधित  करून अथवा ऑनलाईन अर्ज करू शकते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading