कांदा चाळ अनुदान KANDA CHAL MAHADBT

kanda chal anudan
kanda chal anudan

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सर्वशेतकरी मित्रांना आनंदाची बातमी आहे . आज आपण आपल्या या लेखामध्ये बघणार आहोत कि,कांदाचाळ उभारणीसाठी शासनाचे किती टक्के अनुदान मिळते, महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी नवनवीन योजना राबत असते तसेच या योजनेसाठी कोण पात्र असतील हे आज आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत , हा लेख आपणास आवडल्यास पुढे नक्की शेअर करा . Mahadbt Farmer

महाराष्ट्रात प्रामुख्याने कांदा हे प्रमुख पिक मानले जाते , तसेच हे बहुवार्षिक पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकरी साधारणपणे साठवणूक करण्यासाठी कांदाचाळ अथवा दगडी चवथरा तयार करतो , तसेच अशा पद्धतीने साठवणूक केलीतर कांदा हा जास्त दिवस ठेवता येत नाही व लवकर खराब होतो यामुळे  शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कांदा चाळीमुळे कांद्याच्या साठवणुकीत कांद्याची प्रत जशी आहे तशीच टिकून राहते व कांदा जास्तीत जास्त दिवस टिकून राहतो व शेतकऱ्याचा निच्छित फायदा होतो.बदलत्या काळानुसार शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करत आहे, तसेच सध्या कांदा चाळ उभारण्यावर शेतकऱ्यांचा वाढता कल  आहे व शासनाकडून कांदा चाळीसाठी अनुदानही चांगले मिळत आहे.

शासकीय कांदाचाळ योजनेची उद्दिष्ट्ये :Mahadbt farmer

कांदा चाळ उभारल्यामुळे साठवणूक केलेला कांदा टिकतो व नुकसान कमी होऊन आर्थिक फायदा होतो. ज्यावेळी मार्केट ला कांद्याची आवक वाढते आणि दर  कमी होतात , नंतर कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यावर दर वाढतात त्यावेळी अशा समस्येवर नियंत्रण मिळवता येते.

कांदाचाळ उभारणीसाठी शेतकऱ्यांना ५ ,१०,१५,२०,२५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी ५० टक्के रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाते ,तसेच प्रति मेट्रिक टन ३५०० रु.क्षमतेनुसार अनुदान मिळते. तसेच २५ टन कांदाचाळ साठी शासनाकडून ८७ हजार एवढे अनुदान ठरलेले आहे. याआधी सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते , त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कांदाचाळ अनुदान ही MAHADBT योजना सर्व महाराष्ट्रात राबवली जात आहे .ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

कांदाचाळ अनुदानासाठी पात्र / लाभ कोण घेऊ शकतो

  • स्वतः कांदा उत्पादक शेतकरी
  • सहकारी संस्था
  • शेतकऱ्यांचा गट
  • नोंदणीकृत शेतकरी संबंधित संस्था
  • स्वयं सहाय्यता बचत गट
  • शेतकरी महिला बचत गट

आपण या लिंकवर जाऊन रजिस्टर व लॉगीन करू शकता , DASHBORD च्या  उजव्या साईडला नवीन
अर्जदार नोंदणी
 आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक

                 

 

 

 

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading