अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आहे तरी काय?
शासनाने ही योजना खास बेरोजगार युवक/युवती यांच्यासाठी सुरू केलेली असून यांना या योजनेचा भरपूर मोठा फायदा घेता येणार आहे. यामागील मराठी शासनाचा हेतू फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास व्हावा यासाठीच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेले आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी महाराष्ट्रातील आपल्या बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्या साठी तरुण व्यवसाय कडे वळावा हाच हेतू महाराष्ट्र शासनाचा आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील युवकांना अत्यंत सुलभ पद्धतीने कर्ज प्राप्त होणार आहे. या योजनेअंतर्गत जो कर्ज घेणार आहे , त्याचे व्याज पूर्णतः महामंडळ भरणार असून ही योजना लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासन यांच्यामार्फतअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली.महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगार मुलांच्या हाताला काम मिळावे,त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी,व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे .या योजने अंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास संपूर्ण व्याज महामंडळ भरते. त्यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी हातभार लागतो. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळा मार्फत सर्व-तोपरी प्रयत्न केले जात आहेत. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता , आपणास सविस्तर माहिती मिळेल. शासन आता महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्यासाठी विविध सरकारी योजना राबवत आहे. त्या योजनांपैकी ही एक योजना जिचे नाव अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. Annsaheb Patil Karj Yojana भारत देश हा एक जास्त लोकसंख्या असलेला देश समजला जातो. तरुणांना कुशल बनविणे,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुशल मनुष्यबळाची गरज भागविणे व या उत्पादनक्षमता वाढवून या वयोगटातील उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करून त्यांचे जिवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुणांना आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेला सुरुवात झाली. (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal)अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये पुढील महत्त्वाच्या तीन योजना आहेत.
१. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 2. गट कर्ज व्याज परतावा योजना ३. गट प्रकल्प कर्ज योजनाअण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी लागणारी पात्रता
१. अर्जदार स्वतः महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 2. अर्जदाराचे वय १८ ते ४५ पर्यंत असावे ३. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे शहरी भागासाठी ५५ हजार तर ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपये पर्यंत असावे ४. अर्जदार हा किमान गावाकडे तीन वर्षे तरी रहिवासी असावा.अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे
१. अर्जदाराच्या आधार कार्ड अथवा इलेक्शन कार्ड 2. रहिवासी दाखला ३. जन्मता दाखला अथवा वयाचा दाखला ४. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ५. तलाठी यांच्याकडून मिळालेल्या उत्पन्नाचा दाखला ६. कर्ज घेण्यासाठी लागणारा प्रकल्प अहवाल ७. 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र ८. जातीचे प्रमाणपत्र / जातीचा दाखलाया योजनेसाठी वरील कागदपत्रांची आवश्यकता आहे. Annsaheb Patil Karj Yojana
Annasaheb Patil Loan योजनेचा लाभ कुणाला मिळणार ?
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबातील व्यक्तींना किमान १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जात असून तसेच लाभार्थ्याने सर्व कर्जाचे हफ्ते वेळेत भरल्यास त्या हफ्त्याच्या व्याजाची रक्कम परत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साहाय्याने जमा करण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत दिव्यांग असणारे लोकांसाठी ४ टक्के निधी राखीव ठेवला जातो .गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अंतर्गत १० लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येत असून तसेच कर्जाची परतफेड कालावधी ५ वर्षासाठी निर्धारित केली गेलेलीअसून या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय घटकातील उमेदवारांच्या असणारे शासकीय बचत गट,भागीदारी संस्था,सहकारी संस्था,कंपनी शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जात असून महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच आर्थिक पाठबळही मिळते. ही योजना आपल्या फायद्याची आहे. प्रधानमंत्री सौरउर्जा योजनासाठी क्लिक करा या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःच्या नवीन उद्योगासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी १० ते ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक