शेतकरी बांधवासाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी बातमी सरकारकडून मिळणार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान MAHADBT

MAHADBT
MAHADBT

शेतकरी बांधवासाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी बातमी सरकारकडून
मिळणार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान ,त्वरित करा अर्ज…

काही दिवसांत संपूर्ण देशामध्ये खरीप हंगामाची सुरूवात होणार आहे. त्या-मुळे आतापासूनच शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होत आहे. मात्र दिवसें-दिवस शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजुरांची कमी भासत आहे.

जरी शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध असले तरीही शेतकऱ्यांना त्यांची मजुरी देणे परवडत नाही. त्यामुळे आता बहुतांश सर्व शेतकरी कृषी यांत्रिकी-करणाचा आधार घेताना दिसून येत आहेत.महाराष्ट्र शासन आताशेतकऱ्यांना कृषी यांत्रिकी-करण योजनेसाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन कृषी यांत्रिकीकरणातून अनेक महत्वाच्या योजना राबवत आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे पी.एम किसान ट्रॅक्टर योजना २०२३ ही आहे. या योजनेच्या  माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर महाराष्ट्र शासन अनुदान देत आहे.

केंद्र-शासन व महाराष्ट्र राज्य-शासन पुरस्कृत योजना कृषी-विभागामार्फत पूर्णपणे राबविण्यात येते. शासन हे देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवत आहे. पात्र शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत ट्रॅक्टरच्या किमतीच्या  २० टक्के अनुदान देत आहे. 

योजनेसाठी लागणारी पात्रता: 

इच्छुक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पूर्तता / अटी पूर्ण करावे लागतात. या अटींची पूर्तता केल्यानंतर स्वतः शेतकरी या योजनेत सहभागी होऊन शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.

  • या-पूर्वी पात्र ठरलेल्या शेतकऱ्याने या योजनेतून कोणत्याही प्रकारचा ट्रॅक्टर खरेदी केलेला नसावा.
  • शेतकऱ्याकडे शेती-योग्य जमीन आवश्यक आहे.
  • ही योजना फक्त कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे.
  • फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळतो.
  • योजनेसाठी कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती हा अर्ज करू शकतो.

आवश्यक कागदपत्रे:MAHADBT

  • पॅनकार्ड
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • चालू मोबाईल नं.
  • सात बारा / ८अ
  • ड्रायव्हींग लायसन्स
  • बँक पासबुक

अर्ज कसा व कुठे करावा : MAHADBT

या योजनेंतर्गत सरकारकडून सध्या कोणती देखील अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नसून , परंतु या योजनेच्या अंतर्गत सरकार CSC (MAHADBT) केंद्राद्वारे अर्ज मागवू शकते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, शेतकरी आपल्या नजीकच्या CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतो.

ऑनलाईन येथे करा..

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading