Lek ladaki yojana लेक लाडकी योजना महाराष्ट्र

 लेक लाडकी योजना (२०२३-२४) अर्थसंकल्प : लेक लाडकी योजना Lek ladaki yojana 

 

Lek ladaki yojana maharashtra महाराष्ट्र राज्यात लेक लाडकी ही योजना नव्या स्वरूपात सुरू करण्यात आलेली असून, महाराष्ट्र शासन  लवकरच या-संदर्भातील GR निर्गमित करण्यात येईल. लेक लाडकी योजना ही काय आहे ? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी कागदपत्रं कोणती लागतील ? इत्यादी ही  संपूर्ण माहिती आपण या आपल्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहे.हा लेख आपणास आवडल्यास पुढे नक्की शेअर करा.

महाराष्ट्रात शासनाने मुलींच्या सक्षमीकरणसाठी “ लेक लाडकी” ही नवीन योजना २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , उप-मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय भाषणात योजनेचा उल्लेख केला . Lek ladaki yojana

जगत्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की,

     लाडकी लेक मी संतांची |

     मजवरी कृपा संतांची |  

त्याच वाक्याप्रमाणे महाराष्ट्रात आता मुलीच्या शिक्षणाच्या सक्षमीकरणसाठी “लेक लाडकी” हि नवीन योजना शासनाने मुलींसाठी खास सुरु करण्यात आलेली आहे.यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीस ५०००रु. मिळतात,त्यानंतर १ लीत ४०००रु. त्यानंतर ६ वीत ६०००रु.११ वी मध्ये ८ ०००रु. एवढे भरीव अनुदान देण्यात येईल.लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५००० रु.रोख स्वरूपात देण्यात येतील हे  महाराष्ट्र शासनाकडून घोषित करण्यात आले आहे.

या योजनेसाठी असणारी पात्रता :

  • सदर लाभार्थी मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असली पाहिजे.
  • सदर या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतः लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे  रेशनकार्ड हे पिवळ्या / केशरी रंगाचे असने गरजेचे आहे.
  • या योजनेत मुख्यतः फक्त दुर्बल वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच लाभ देण्यात येतो.
  • 18 वय वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शासनाकडून लाभार्थीस 75 हजार रुपये मिळवायचे असल्यास, सर्व शैक्षणिक कागदपत्रं जवळ असणे गरजेचे आहे.

लेक लाडकी या  योजनासाठी आवश्यक  असणारी कागदपत्रे (Documents) :Lek ladaki yojana

  • स्वतः मुलीचे आधारकार्ड (UID)
  • मुलीचा जन्म दाखला
  • रहिवाशी दाखला
  • अत्यावश्यक शैक्षणिक कागदपत्रं
  • कौटुंबिक राशनकार्ड (पिवळा / केशरी)
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला

 

लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे  परंतु अद्याप या योजनेअंतर्गत Online Registration अथवा फॉर्म  भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत पोर्टल अथवा वेबसाईट सुरू करण्यात आली नाही. अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा ऑफलाईन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आमच्या अधिकृत साईटवरती याची संपूर्ण माहिती आपणास  देण्यात येईल.

Lek Ladki Yojana ही योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली असूनया  अर्जासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नसून याबद्दलची लवकरच माहिती देण्यात येईल.

 

 

 

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading