घरेलू महिला कामगार कल्याणकारी योजना आणि नोंदणी अर्ज (महाराष्ट्र शासन) Gharelu Kamagar Yojana
घरेलू महिला कामगार कल्याणकारी योजना आणि नोंदणी अर्ज Gharelu Mahila Kamagar Yojana
नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या पोस्टमध्ये घरेलू महिला कामगार कल्याणकारी योजना आणि नोंदणी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत , महाराष्ट्र शासनाने घरेलू कामगार तसेच इतर कामगार यांच्यासाठी महत्वाच्या योजना राबवत आहे, तसेच दरवर्षी महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या योजना राबवते . आपण आज या पोस्टबद्दल सविस्तर माहिती माहिती पाहणार आहोत , माहिती आवडल्यास पुढे नक्की शेअर करा.
अर्ज कसा करावा ? अर्जासोबतकागतपत्रे कोणती जोडायचे ?
1.या अर्जासाठी 30 रुपये शासकीय शुल्क चलन
2.वयाचा दाखला / जन्माचा दाखला
3.सध्याच्या स्थितीत आपण जेथे काम करतो त्या मालकाचे प्रमाणपत्र अथवा घरेलू कामगार असल्याचे प्रतिज्ञापत्र
4.ग्रामपंचायत / नगरपालिका रहिवासी दाखला
5.घरेलू कामगाराचे ३ पासपोर्ट-साईज फोटो
सुरुवातीला नोंदणी झाल्यावर जिल्हा ठिकाणच्या सचिव कामगार आयुक्त कर्यालय येथे यांची नोंद नोंदवहीत होईल. ही नोंद मात्र नमुना छ नुसार असणार आहे. सोबत त्यांना घरेलू कामगार आहेत असे म्हणून प्रत्येक लाभार्त्यास कार्यालयाकडून ओळखपत्र देण्यात येईल. नंतर प्रत्येक घरेलू कामगाराला 5 रुपये मंडळाकडे दरमहा ही रक्कम द्यावी लागते. Gharelu Mahila Kamagar Yojana
घरेलू महिला कामगार यांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा होतो.
1) जनश्री विमा योजना
2) विदेशी भाषा प्रशिक्षण
3) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम यासाठी अर्थसहाय्य
4) अंत्यविधी सहाय्य
1) जनश्री विमा योजना
1. घरेलू महिला कामगार यांचा जर नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्यास नोंदणीकृत घरेलू कामगाराच्या वारसदारास 30,000 रुपये त्वरित देण्यात येतात.
2. जर महिला कामगार यांचाअपघाती मृत्यू झाला तर वारसदारास 75,000 रुपये देण्यात येतात.
3. जर नोंदणीकृत घरेलू कामगार यांचा तर अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास तर त्या कामगारास 75,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येते.
त्याशिवाय नोंदणीकृत घरेलू कामगार यांच्या मुलांना इयत्ता 9 वी ते 12 वी आणि तसेच ITI कोर्स करता दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास दर तीन महिन्यातून 300 रु रक्कम देण्यात येते, ही रक्कम आता वाढलेली आहे.
2) विदेशी भाषा प्रशिक्षण :
महाराष्ट्र महिला घरेलू किवा घरगुती कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या घरेलू कामगारांचे विदेशी भाषा शिकवण्याचे व प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जातात. या नोंदणीकृत घरेलू कामगारांच्या मुलांना विदेशी भाषा शिकता यावी म्हणून या कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या मुलांना विदेशी भाषा शिकण्याची संधी देण्यात येते
3) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम खर्च
या महिला घरेलू नोंदणीकृत कामगारांसं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा मार्फत पदविका तसेच त्याच्या मुलांना यांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आहे त्यामध्ये या पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळामार्फत 900 रुपये तसेच पूर्व तयारी शिक्षणासाठी 650 रुपये देण्यात येते
4) अंत्यविधी सहाय्य :
मृत घरगुती कामगारांच्या वारसदारास अंत्यविधी साठी 2,000 रुपये देण्यात येते.कामगार मंडळाच्या 07.08.2013 रोजीच्या बैठकीत 12 अर्जाना मान्यता देण्यात आली आहे. घरेलू महिला कामगार मंडळाच्या 28.09.2012 च्या बैठकीत घरेलू कामगारांना प्रसूतीसाठी लाभ देण्या-बाबत ठराव करण्यात आला त्यांना दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसूती साठी 5,000 रुपये एवढी मदत देण्यात येईल. Gharelu Mahila Kamagar Yojana
घरेलू महिला कामगार कल्याणकारी योजना आणि नोंदणी अर्ज