अर्ज एक योजना अनेक ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाने कृषी विभागामार्फत सुरू केलेली असून ,कृषी विभागाने सदर ही योजना महा-डीबीटी पोर्टलवर सुरू केलेली आहे . शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याचा प्रयत्न केला असून आणि ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्त्मिक संगणक प्रणाली विकसित केलेली असून त्यामुळे शेती निगडित असणाऱ्या विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
या योजने संदर्भातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत:
1. महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित व्हावी.
2. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती निगडित बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.
कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या योजनेखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने व अर्ज केल्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या संगणकीय प्रणाली द्वारे त्यांना आपल्या शेती संदर्भात आपल्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले असून त्यांना शेती निगडित विविध बाबीसाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनामार्फत कृषी विभागाकडून केलेले आहे. त्यासाठी कृषी विभाग तत्परतेने कामही करत आहे. MAHADBT
MAHADBT योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे:
- स्वतः शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा व आठ अ
- आधार कार्ड
- आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.
- नॅशनल बँकेचे पासबुक
- अर्जदार मागासवर्गीय असल्यास त्याच्या जातीचा दाखला.
- पॅन कार्ड
आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपल्या योजनांसाठी अर्ज केलेल्या नसेल , अशा शेतकऱ्यांनी त्वरित आपला अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्याचे आवाहन केलेले आहे , तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे शासनाचे म्हणणे आहे. ज्यावेळेस शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर आपली नोंदणी करतो त्यासाठी तो त्या लॉटरीसाठी ग्राह्य धरला जातो , या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःचा मोबाईल , जमिनीचा सातबारा आठ अ उतारे , आधार कार्ड असावे , सदरचा अर्ज शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र अथवा ग्रामपंचायत / सीएससी सेंटर यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरून घ्यायचा आहे.mahadbt
शेतकऱ्यास महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर “शेतकरी योजना” या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.MAHADBT
मराठी पोर्टलवर शेतकऱ्यांना खालील प्रकारच्या योजना मिळवता येतील.MAHADBT
१. ठिबक सिंचन प्रणाली
2. तुषार सिंचन प्रणाली
३. ट्रॅक्टर योजना
४. ट्रॅक्टर अवजारे
५. मनुष्य चलीत अवजारे
६. कांदा चाळ
७. रोपवाटिका
८. कडबा कुट्टी मशीन
९. शेतातील पाईपलाईन
१०. विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर
११. स्पिंकलर
१२. बीबीएफ पेरणी यंत्र
१३.वैयक्तिक शेततळे
१४.शेततळे अस्तरीकरण
अजून भरपूर योजना शेतकऱ्यांसाठी या महाडीबीटी पोर्टलवर पाहायला मिळणार आहेत.MAHADBT