नमस्कार मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्टमध्ये पीएम विश्वकर्मा योजना म्हणजेच मोदी सरकारची विश्वकर्मा योजना विश्वकर्मा यांचा अर्थ असा की महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या 12 बलुतेदार या जातींमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय लोक आपल्या कलेवर जीवन जगत आहेत , या कला म्हणजे पुढे देणारे आपण माहिती मध्ये सर्व जातींचा उल्लेख करणार आहोत , विश्वकर्मा ही माहिती आपणास समजण्यासाठी पूर्ण माहिती वाचावी लागेल , यातील काही योजना आपल्या महत्त्वाच्या कामाच्या आहेत , तर त्या योजना पुढील प्रमाणे सविस्तर पाहणार आहोत.
आपल्या स्वतंत्र भारत देशामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राहणाऱ्या पारंपरिक हस्तकलाकार तसेच कारागीर या लोकांना साह्य देण्यासाठी आपल्या भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी आणलेली असून या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ही मिळालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अंदाजे 13000 कोटी रुपये एवढा अपेक्षित खर्च असून प्रेम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये किमान 18 पारंपारिक उद्योगांचा समावेश असेल.
या पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्टे व ध्येय पुढील प्रमाणे :Pm Vishwakarma Yojana
भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली असणारी आर्थिक बाबींवर चर्चा करणारी मंत्रिमंडळ समिती यांनी 13000 कोटी अपेक्षित खर्च असून या योजनेला या मंत्रिमंडळ समितीने “पीएम विश्वकर्मा” असे नाव दिलेले आहे केंद्र सरकारने या योजनेच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजेच आर्थिक वर्ष(2023-2024 ते आर्थिक वर्ष 20 27-2028) होय.
देशातील कलाकार हा इतर कलाकार हे आपल्या हाताने किंवा साधनांच्या मदतीने काम करतात काही कुटुंब आपल्या उदरनिर्वाह करता पारंपरिक कौशल्य जोपासत असतात, त्यांच्या या कौशल्यला बळकटी देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट आहे
पीएम विश्वकर्मा योजनेचे ध्येय :Pm Vishwakarma Yojana
पीएम विश्वकर्मा या योजनेच्या अंतर्गत कारागीर यांना यांचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख मिळाली पाहिजे तसेच पाच टक्के सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपये पर्यंत व दुसऱ्या टप्प्यांमध्ये दोन लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा झाला पाहिजे , ही योजना त्याशिवाय पीएम विश्वकर्मा योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजार घेण्यासाठी अर्थसहाय्य प्रोत्साहन मिळेल. मुख्यतः ही योजना भारत देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील हस्तकलाकार व कारागीर यांना मदत करेल. तुझ्या विश्वकर्मा योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 18 पारंपारिक उद्योगांचा समावेश होईल.
पारंपारिक उद्योग पुढीलप्रमाणे:
१. सुतार
२. होडी बांधणारा कारागीर
३. चिलखत बनवणारे कारागीर
४. लोहार
५. अवजार बनवणारे
६. कुलूप/टाळा बनवणारे कारागीर
७. सोनार
८. कुंभार
९. दगडी काम करणारे मूर्तिकार/शिल्पकार
१०. चांभार
११. मिस्तरी/ गवंडी काम करणारे
१२. चटया/झाडू/ टोपल्या बनवणारे कारागीर
१३. खेळणी बनवणारे कारागीर
१४. न्हावी
१५. माळी/फुलांचे हार बनवणारे
१६. धोबी /परीट
१७. मासेमारी जाळे विणणारे
१८. विणकाम करणारे
अशाप्रकारे अठरा पारंपरिक उद्योगांचा यामध्ये समावेश होणार आहे.Pm Vishwakarma Yojana
या पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी असून ही नोंदी आपणास स्वतःला सीएससी , आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत याठिकाणी नोंदणी करता येईल , या नोंदणीसाठी आधार कार्ड, नॅशनल बँकेचे पासबुक , आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आणि स्वतः व्यक्ती असला पाहिजे .
ते विश्वकर्मा या योजनेमध्ये नोंदणी झाल्यानंतर वेगवेगळ्या व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण असणार आहे , या अठरा व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून, या प्रशिक्षणा दरम्यान प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जाईल आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपल्या व्यवसायासाठी जी टूल किट लागणार आहे ती खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये त्वरित मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतः व्यक्तीला श्रमिक पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे , ही जबाबदारी शासनाने ग्रामीण भागातील ग्रामविकास अधिकारी आणि पंचायत राज विभाग यांच्याकडे सोपवली आहे
विश्वकर्मा या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
Pm Vishwakarma Yojana
१. आधार कार्ड
२. पॅन कार्ड
३. तहसील उत्पन्न प्रमाणपत्र
४. जातीचे प्रमाणपत्र
५. ग्रामपंचायत रहिवासी दाखला
६. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
७. नॅशनल बँकेचे पासबुक
८. स्वतःचा चालू मोबाईल नंबर
आपणास अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे Pm Vishwakarma Yojana