किसान क्रेडीट कार्ड Kisan Credit Card

आपला भारत देश हा  प्रामुख्याने  कृषी प्रधान देश  आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आहे. अशा परिस्थिती-मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी विविध योजना राबवत  असते. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना होय  (KCC) याचा लाभ कोणाला आणि कसा मिळणार? आणि याचे शेतकरी वर्गाला फायदे काय आहेत ? या-संबंधीची महत्वाची संपूर्ण सर्व माहिती आपण आजच्या या लेखातून पाहणार आहोत. तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा व माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी वर्गा-पर्यंत नक्की पोहोचवा.

KISAN CREDIT CARD

Kisan Credit Card  (KCC) Yojana

पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांना आपली आर्थिक अडचण सोडवण्यासाठी जमीनदार किंवा सावकार यांच्याकडून व्याजाने रक्कम घ्यावी लागत होती. या सावकारी कर्जामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ओझे हे दिवसें-दिवस वाढत जाऊन आणि पुढे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला.  या गोष्टीचा प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने विचार केला आणि त्यानंतर शासनाकडूनच कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे या उद्देशाने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरु झाली.

 Kisan Credit Card Yojna (KCC) सुरू करण्यात आली. आणि या योजने-मार्फत शेतकऱ्यांना निश्चितच मर्यादे-पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. 

ज्या-ज्या वेळी शेतकऱ्यांना कर्जाची गरज भासेल अशावेळी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या किसान क्रेडिट
कार्ड वरून रक्कम काढू शकतात. आणि मग दिलेल्या मुदतीत कमी व्याजदर ठरवलेली रक्कम शेतकरी
बँकेमध्ये भरू शकतो.

किसान क्रेडिट कार्डचे फायदे

ज्या शेतकऱ्यांकडे एकच किसान क्रेडिट कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्डच्या (KCC) माध्यमातून भारत सरकार कमी व्याजदरामध्ये तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. हे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने असून ज्या शेतकऱ्याला हे किसान क्रेडीट कार्ड मिळवायचे असेल त्यासाठी  त्यांचे किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ७५ वर्ष असणे आवश्यक आहे.

 

किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्डप्रत
  • रहिवासीअसल्याचापुरावा
  • बँक पासबुकप्रत
  • शेतकऱ्याचा शेत-जमिनीचा सातबारा व ८अ उतारा
  • मोबाईलनंबर
  • पासपोर्टसाईजचेदोन फोटो
  • कोणत्याही बँकेमधूनकर्ज न घेतल्या-बाबतचे प्रतिज्ञा-पत्र

 

 

किसान क्रेडिट Kisan Credit Card या कार्डसाठी पात्रता काय?

किसान क्रेडिट कार्ड हे प्रामुख्याने (KCC) योजने-अंतर्गत भारतातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. परंतु त्या-साठी सुद्धा काही पात्रता ठेवण्यात आली आहे. जसे की, अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय किमान १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ७५ वर्षा-पर्यंतच असले पाहिजे.

शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावाने शेत-जमीनीचे क्षेत्र असावे किंवा भाडे-तत्त्वावर (करारावर) शेत जमीन असेल अशाही शेतकऱ्यांना त्या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येतो. त्या शेतकऱ्याचे उत्पन्न कमीत कमी ५००० रुपये किंवा त्याच्या-पेक्षा असले पाहिजे.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) साठी तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या-अंतर्गत अर्ज करत असाल, तर तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेचचा लाभार्थी असणे आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? Kisan Credit Card 

केंद्राने फेब्रुवारी २०१९ साला मध्ये एक महत्वाच परिपत्रक काढलं आहे. त्याच्या नुसार देशामध्ये ६.९५ कोटी शेतकरी किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card (KCC) वापरत असल्याचे सांगण्यात आले होते. असे असले तरीही मोठ्या प्रमाणावर शेतकरी किसान क्रेडिट कार्ड व पर्यायी त्या-पासून मिळणाऱ्या कृषी कर्जापासून Crop Loan हे त्यापासून वंचित राहत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनात आले .त्यासाठी जास्तीत जास्त भारतातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने फेब्रुवारी २०२० मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थीना किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

किसान क्रेडिट कार्ड साठी (KCC) शेतकऱ्यांना दोन पद्धतीने अर्ज करता येईल. पहिलाअर्ज म्हणजे ऑफलाईन पद्धती आणिव दुसरी ऑनलाईन पद्धतीने. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर अर्जदार पीएम किसान योजनेचा लाभ घेत असावा . तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर अशी कोणत्याही प्रकारची अट नाही.

ऑनलाइन पद्धती : किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो हा अर्ज तुम्हाला CSC म्हणजेच (Common Service Centre) मध्ये जाऊ शकता. तिथे जाऊन क्रेडिट कार्ड  साठी फॉर्म भरावा लागतो त्याच्या सोबत वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतात. मग तो त्यानंतर तुम्हाला अर्ज भरल्याची पोहोच पावती देतो.  अर्ज ऑनलाईन करताना शेतकऱ्याकडून एक ठराविक शुल्क घेतली जाते.

ऑफलाइन पद्धती : ऑफलाईन अर्ज करायच्या सुद्धा दोन पद्धती असतात. सुरुवातीची पहिली पद्धत-म्हणजे तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी असाल तरच अर्ज करण्याची पद्धती वेगळी आहे. यामध्ये अर्जदाराला  करावा लागेल. त्यानंतर तो फॉर्म तुम्ही स्वतः भरून संबंधित बँकेत सर्व कागदपत्रां-सहित जमा करावा लागेल. मग त्यानंतर आपणास बँकेच्या मार्फत किसान क्रेडिट कार्ड (KCC)  ची प्रक्रिया पूर्ण होते .

दुसरी पद्धत  जर तुम्ही पी.एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला इंडियन बँकच्या असोसिएशनने कृषी कर्जा-साठी बनवलेल्या स्टॅंडर्ड फॉर्मेट मधून अर्ज भरून द्यावा लागतो त्यानंतर तुम्ही तो अर्ज भरून सर्व कागदपत्रां-सहित बँकेत सबमिट करू शकता.

 

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading