Namo shetkari yojana नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार कधी?

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता येणार  कधी ? : नमस्कार शेतकरी मित्रानो महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा ऑक्टबर 2023 महिन्यात येऊन गेलेला आहे. आपला शेतकरी हा  नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता कधी येणार ? याच्या प्रतीक्षेत नक्कीच आहे.

आज आपण आजच्या पोस्ट मध्ये  नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Namo shetkari yojana 2 nd installment  महाराष्ट्र शासनाकडून, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक अनुदान तसेच मदत म्हणून फेब्रुवारी 2023 च्या बजेट मध्ये ” नमो शेतकरी योजना ” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जे पी एम किसान योजनेमध्ये जे  पात्र असतील त्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो चा पहिला हप्ता मिळेल असे सांगण्यात आले .

26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच शिंदे सरकार कडून आधार लिंक खात्यावर जमा करण्यात आला आहे.

नंतर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा जानेवारी 2024 मध्ये येईल असे सांगण्यात आले होते. पण जानेवारी 2024 मध्ये ही हा हप्ता आला नाही.

मग नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता येणार कधी ?

Namo shetkari yojana 2nd installment  : केंद्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता येणार कधी या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर तो हप्ता या फेब्रुवारी 2024 ह्या शेवटच्या हप्त्यामध्ये पैसे जमा होणार आहे. या संदर्भात माहिती काही वृत्त वाहिन्यां-मध्ये सुध्दा प्रसिद्ध झालेली आहे.

नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता यासाठी  पात्रता काय ?

नमो शेतकरी योजना चा दुसरा हप्ता येणार  कधी ? :

1. नमो शेतकरी योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

2. या लाभार्थी कडे कमीत कमी शेती योग्य जमीन पाहिजे आणि ती साल फेब्रुवारी 2019 च्या अगोदर त्या लाभार्थी च्या नावाने असलेली पाहिजे.

3. जो कोणी लाभार्थी असणार आहे त्याच्या कुटुंबातून फक्त एक जणालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे , जरी कुटुंबात इतर सदस्याच्या नावाने जमीन असली तरीही.

4. लाभार्थीच्या नावे आयकर भरलेला नसावा .

नमो शेतकरी या योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी कागदपत्रे कोणती ?

१. आधार कार्ड (UID)

२. राशन कार्ड

३. बँक पासबुक आधार कार्ड शी लिंक असणे गरजेचे आहे.

४. आठ अ  आणि सातबारा उतारे.

५. सामाईक खाते असेल तर सर्वांचे संमती पत्र.

६.विहित नमुना अर्ज/फॉर्म.

२. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या बँक खात्यावर येणार आहे ?

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा आधार लिंक बँक खात्यावर जमा होणार आहे तसेच हे आधार कार्ड आणि सबंधित बँक खात्याला लिंक असले पाहिजे. आधार लिंक नसेल तर येणारा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तुमच्या बँक खात्यावर येवूच शकणार नाही त्यासाठी आधार बँक लिंक Ekyc करणे अत्यंत गरजेचे आहे.

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये नक्की येणार आहे.

खाली दिलेल्या लिंक वर आपण क्लिक करून दुसऱ्या योजनेचा हप्ता चेक करू शकता


Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading