महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना २०२३

bachat-gat-yojana सरकारची महिलांसंबंधी सर्वात खास योजना..! आता मिळणार बचत गटातील महिलांना विनातारण 20 लाख रुपये कर्ज :

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्या-नंतरच्या काळात महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी भारत सरकारने देशभरात अनेक प्रकारच्या योजना राबवल्या आहेत. देशातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही उमेद अभियान या अंतर्गत महिला कर्ज योजना महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी केली आहे. या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा इतर कामांसाठी २० लाख रुपये विनातारण कर्ज दिले जात आहे. Mahila Bachat Gat Samruddhi Loan Yojana Maharashtra Shasn 2023 काय आहे ही योजना? कर्ज कोणाला मिळणार? याचे उद्दिष्ट काय यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखा-मार्फत जाणून घेनार आहोत , आपणास हा लेख आवडल्यास पुढे नक्की शेअर करा.
bachat-gat-yojana महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ या-मार्फत महिला स्वयंसिद्धी व्याज योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवली जात आहे. देशातील नव्हे तर राज्यातील खेड्या-पाड्यातील आणि ग्रामीण भागातील महिलांना सोप्या पद्धतीने पैसा / कर्ज उपलब्ध व्हावे आणि त्यातून या महिलांनी त्याचा उपयोग उद्योग व्यवसाय उभारून सक्षम होण्यासाठी तसेच गावामध्ये बचत गटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी असे सरकारचे मोठे धोरण आहे.
महिला बचत गटांसाठी महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा कर्ज योजना (महाराष्ट्रशासन) 

महाराष्ट्र शासनाच्या या योजनेच्या-अंतर्गत राज्यातील प्रत्येक गरजू महिलांना २० लाख रुपयांपर्यंत कमी व्याज दराने कर्ज मिळू शकणार आहे. त्याच-बरोबर यासाठी कोणतेही प्रकारचे ताररण ठेवण्याची कोणतीही गरज नाही.  तसेच हे २० लाख रुपयांचे कर्ज / लोन घेऊन महिला आपला छोटा-मोठा उद्योग देखील सुरू करून आपल्या स्वतः पायावर उभे राहू शकतात. गावा गावातील प्रत्येक अशा बचत गटांना अशा विविध योजनांचा लाभ मिळतो. त्यामधीलच ही एक महत्वाची योजना आहे.  योजनेच्या अंतर्गत इतर मागासवर्गातील ज्या गरीब महिला असतील, त्याच सोबतच होतकरू, परीतक्त्या महिला यांना या योजनेचा लाभ मुख्यत्वे  सक्षम करणे हा या योजनेचा प्रमुख मुख्य उद्देश आहे. bachat-gat-yojana

 स्वयंसिद्धी कर्ज (महाराष्ट्र शासन)योजनेचे स्वरूप कसे असेल? bachat-gat-yojana

 महाराष्ट्र शासन महिला आर्थिक विकास  CMRC मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटातील किमान ५०% इतर मागास प्रवर्गातील महिला असतील त्यांच्या अशा बचत गट शासनाच्या व्याज परतावा योजनेसाठी पात्र असेल.पात्र असलेल्या महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना सदर योजनेचा व्याज परतावा लाभ ओबीसी महामंडळाकडून महिला बचत गटांना मुख्यत्वे घेता येईल. सदर बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून तसेच इतर शासकीय विभागाच्या किंवा महामंडळाच्या लाभ देण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न करण्यात येतील.  इतर मागास (इ.मा.व.)प्रवर्गातील किमान ५०% महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटाला मंडळाकडून प्रथम टप्प्यात रु.५ लाख (लक्ष) पर्यंत कर्ज बँकेकडुन उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात येते. प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित सदर बचत गट द्वितीय टप्यात रु.१० लाख पर्यंत कर्ज काढण्यास बँकेकडुन मंजुर करुन घेण्यास पात्र होईल. bachat-gat-yojana

बँकेकडुन मंजुर झालेल्या कर्ज कमाल १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा ओबीसी महामंडळामार्फत परत अदा करण्यात येते. ओबीसी महामंडळा-मार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यात दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजूरीनुसार ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीकरीता बँक प्रमाणिकरणानुसार बचत गटासाठी अदा करण्यात येईल. महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या बँका व CMRC यांचेदरम्यान करण्यात आलेल्या१% शुल्क हे कर्ज रक्कमेवर व १% शुल्क हे परतफेड रक्कमेवर अदा केले जाईल. त्याच धर्तीवर सदर योजनेत बँकेने मंजुर केलेल्या रक्कमेच्या १% प्रशासकीय शल्क कर्ज मंजुरीनंतर आणि १% प्रशासकीय शुल्क रक्कम संपूर्ण मुद्दल रक्कमेच्या कर्ज फेडीनंतर ओबीसी महामंडळाकडून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे अदा करण्यात येईल.

सदरच्या अर्जासोबत सादर करायची महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-bachat-gat-yojana

सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला.(Magistrate)

 – वयाचा पुरावा. (आधार कार्ड , शाळेचा दाखला , Pan Card

गावचा रहिवासी दाखला.

बचत गटाचे बँक पासबुक ( प्रत )

– CMRC कडून प्रमाणित झालेले कुटुंब उत्पन्न प्रमाणपत्र.

  – स्वतः अर्जदार महिलेने या-आधी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

– महिलेचे वय किमान कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ६० वर्षे असावे .

ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (OMRC) च्या सहाय्याने राबविण्यात ये आहे. बचत गटामध्ये किमान ५० टक्के इतर मागास प्रवर्गातील महिला असतील .हाच बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात १० लाख रुपयांपर्यंत कर्ज बँकेकडून घेण्यास पात्र राही तसेच बँकेकडून मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेवरील कमाल १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा ओबीसी महामंडळाकडून अदा करण्यात येईल, या योजनेचे स्वरूप, अर्जदाराच्या पात्रतेच्या अटी आणि शर्तीअर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती  दिनांक ०७ जून २०२२ च्या महाराष्ट्र शासन निर्णयात(GR) देण्यात आला  आहे.

महाराष्ट्र शासनाचा GR व अर्ज bachat-gat-yojana

 महिला वर्गासाठी अजून एक महत्वाची योजना – योजना वाचून लगेच करा अर्ज

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading