Shetmal Taran Karj Yojana महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू,शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

Shetmal Taran Karj Yojana  : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतमाल तारण कर्ज   योजना सुरू , शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

Shetmal Taran Karj Yojana Maharastra State : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतमाल तारण कर्ज  योजना सुरू , शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

 

                                                   अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,  आज आपण आजच्या पोस्ट मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कृषि- पणन व्यवस्थेत अद्ययावतपणा बरोबरच सुसूत्रता आणि समन्वय आणण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ महत्त्वपूर्णकाम करत आहे. कृषि-पणन महामंडळ पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण तसेच सुधारणा आणण्याबरोबरच महाराष्ट्र राज्यात कृषि पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध प्रकल्प, योजना , नवीन कार्यक्रम आखणे तसेच शेतकरी बांधवासाठी आणि शेतकरी संस्थांच्या विकासासाठी पणन मंडळ सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. Shetmal Taran Karj Yojana 

 महाराष्ट्र राज्यात कृषि मालाची निर्यात करण्यासाठी निर्यात सुविधा केंद्रांची स्थापना करुन ही केंद्रे सक्षमपणे चालवण्यासाठी राज्याकडून प्रयत्न केले जात असून कृषि पणन मंडळातर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे शेतमाल तारण कर्ज योजना Shetmal Taran Karj Yojana Maharastra State. आज आपण याविषयी संपूर्ण  माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत .

कशी असते शेतमाल तारण कर्ज योजना ?

प्रत्येक राज्यातील शेतकऱ्याला आर्थिक उणीव जाणवतेच आणि  गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा जागेवर उपलब्ध नसल्यामुळे पिक काढणी कालावधीत शेतीमाल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठीक-ठिकाणी आणला जातो आणि त्यामुळे या कालावधीत शेतमालाचे बाजारभाव पूर्णपणे ढासळतो. शेतमालास योग्य तो  हमीभाव बाजार न मिळाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. तसेच मात्र काढणी हंगामात शेतमालाची साठवणूक करुनही तो काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीस आणल्यास त्या साठवलेल्या मालास  जादा बाजारभाव मिळू शकतो. तसेच शेतकऱ्यांस सुगीच्या कालावधीत असलेली आर्थिक चलन  विचारात घेऊन त्यांना या गरजेच्या-वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रराज्य कृषि पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे.

या योजनेमध्ये प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात ( धान ), करडई, ज्वारी,बाजरी, मका, गहू,राजमा, हळद, काजू बी, बेदाणा व सुपारी या शेतमालाचा यात  समावेश करण्यात आलेला असून या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामामध्ये तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज-दराने तारण कर्ज शासन निर्णय देण्यात येते.  सदर योजना ही पणन मंडळाच्या स्व-निधितून बाजार समित्यांमार्फत राबविली जाते तसेच सहा महिन्यांच्या  आत तारण कर्जाची परतफेड केलेल्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याजदर सवलत पणन महा-मंडळाकडून देण्यात येते. तसेच ज्या बाजार समिती तारण कर्ज योजना देतात  त्यांना वाटप केलेल्या तारण कर्ज रक्कमेवर 3 टक्के व्याजदर अनुदान स्वरूपामध्ये शेतकऱ्यास देण्यात येते.

या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे 

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा, धान, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका, बेदाणा, काजू बी, हळद, सुपारी व राजमा या शेतमालाचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत असलेल्या मालास 6 टक्के व्याजदराने 6 महिने कालावधीसाठी शेतकऱ्यास कर्ज त्वरित उपलब्ध करुन दिले जाते. सरकारी  बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या  कृषी शेतमालासाठी विमा, गोदाम भाडे,   देखरेख खर्च इ. सर्व खर्चाची जबाबदारी ही बाजार समितीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना  त्याचा कोणताही  परिणाम  नाही. शेतकऱ्याच्या शेतमालाच्या प्रकारानुसार राजमा पिकासाठी  बाजारभाव 75 टक्के अथवा प्रति क्विंटल 3 हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम 6 महिने मुदतीसाठी 6 टक्के व्याजाने देण्यात येत तर काजू बी आणि सुपारीसाठी बाजार भावानुसार एकूण सरासरी किमतीच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 100 रुपये प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम ही 6 महिने मुदतीसाठी 6 टक्के व्याजाने देण्यात येते. बेदाणा पिकासाठी एकूण किंमतीच्या कमाल 75 टक्के अथवा यामध्ये  जास्तीत जास्त 7  हजार रु., तसेच  500 प्रति क्विंटल यातील कमी असणारी रक्कम 6 महिने मुदतीच्या 6 टक्के व्याजाने शेतकऱ्याला देण्यात येते.  महाराष्ट्र राज्य कृषि-पणन महा-मंडळामार्फत 2022-23 या वर्षीच्या हंगामात राज्यातील 61 बाजार समित्यांनी 3 हजार 269 शेतकऱ्यांचा 1 लाख 47 हजार 293 क्विंटल शेतमाल तारणात स्विकारुन त्यांना एकूण 39 कोटी 98 लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेचे तारण कर्ज हस्तांतरीत करण्यात आले आहे .बाजार समित्या व शेतकऱ्यांकडून या महाराष्ट्र शासनाच्या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि शेतमाल तारण कर्ज योजना ही महत्व कांशी  योजना या मध्ये  धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत फायदेशीर ठरली आहे .

अधिक माहितीसाठी स्वतः शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषि-पणन मंडळाच्या  www.msamb.com ला द्यावी.शेतकऱ्यांनी तारण कर्ज घेण्यासाठी योजनेमध्ये समाविष्ट असलेला शेतमाल बाजार समितीच्या गोदामात ठेऊन तारण कर्ज मागणी अर्जाच्या विहित नमुन्यातील अर्जा-सोबत ८-८ अ आणि ७/१२ उतारा, आधार कार्ड नंबर व इतर वैयक्तिक कागदपत्रासह बाजार समितीस द्यायचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी वखारी महामंडळाच्या गोदामामध्ये साठवलेला शेतमाल ठेवला असेल त्यांनी त्या अर्जासोबत गोदाम पावती सदर बाजार समितीस देणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाची ही योजना यशस्वी होण्यासाठी शेतकरी बंधूंच्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत.

तमाल तारण कर्ज योजना महाराष्ट्र :

 • शेतकर्‍यांनी बाजार समितीत आपलाच माल तारण ठेवावा. व्यापाऱ्याचा माल शेतकऱ्यांनी कधीच आपल्या नावावर तारणात ठेऊ नये.
 • शेतीतला शेतमाल काढल्यावर तारण योजने अंतर्गत तारणात ठेवण्यापुर्वी शेतकऱ्यांनी शेतमालाची स्वच्छता आणि प्रतवारीत सुधारणा करणे आवश्यक आहे.
 • प्रत्येक शेतमालातील इतर घटकांचे तसेच तापमान आद्रताचे प्रमाण किती असावे, याबाबतचे शास्त्रशुध्द
  प्रमाण निश्चित करण्यात आलेले असून त्यानूसार तारणात ठेवावयाचे शेतमालामध्ये इतर घटकही आणि आर्द्रता यांचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कधीही जास्त असू नये. अन्यथा अशा मालाचे तसेच त्यामुळे गोदामात आपल्या मालासोबत साठविलेल्या इतर शेत मालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
 • स्वतः शेतकऱ्यांनी 180 दिवसात बाजार भावाचा अभ्यास करुन योग्य वेळी तारणातील शेतमालाची विक्रीची दक्षता घ्यावी. 180 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यास शेतमाल तारण ठेवल्यास पुढील हंगामातील शेतमालाची आवक जास्त सुरू होऊन बाजारभाव ढासळण्याची शक्यता जास्त असते. तसेच 180 दिवस झाल्यावर तारण कर्जावर व्याजाची वाढीव दराने आकारणीही बाजारसमिती कडून करण्यात येते.  महाराष्ट्र शासनाच्या राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमाल ठेवण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येते. शेतकऱ्यांना गोदाम भाडयात मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येते. कृषी पणन महा मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी येत्या हंगामात पिकवलेला शेतमाल तारणात ठेऊन फायदा घ्यावा. या-करिता शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषि उत्पन्न बाजार समितीशी आणि कृषि पणन मंडळाचे विभागीय कार्यालयाशी संपर्क साधुन शेतमाल तारण योजनेच्या अंमलबजावणी बाबत अधिक माहिती घेऊन संपर्क साधावा.
 • महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात योजनेचा व्यापक प्रचार व जाहिरात प्रसिद्धी करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचवुन शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 • शेतातील शेतमाल तारण कर्ज योजनेच्या अंतर्गत बाजार समित्यांना तात्काळ सरकारी निधी उपलब्ध करून
  दिला जातो.
 • तारण कर्ज योजना ही शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी
  शेतकऱ्यांची माहिती ही त्यास तात्काळ उपलब्ध होईल. स्व-मालकीचे गोदाम उपलब्ध नसलेल्या बाजार समित्यांना कार्य-क्षेत्रातील सहकारी संस्थांचे गोदाम भाड्याने घेऊन शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्याची सवलत ही शासनाकडून शेतकऱ्यांनादेण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यकृषि पणन मंडळआर-7, मार्केट यार्ड, गुलटेकडीपुणे-411 037 020-24528100, 24528200

 अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading