महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आता शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत, पंचनाम्यासाठी ड्रोन Nuksan Bharpai

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आता शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत, पंचनाम्यासाठी ड्रोन  Nuksan Bharpai

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर मिळणारे नुकसानभरपाई ची प्रक्रिया ही अत्यंत संथ गतीने चालू आहे.ही गती वाढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ड्रोनद्वारे पंचनामे ही महत्वाची योजना राबवण्याचे काम सुरु आहे. एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी करणे म्हणजे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येतात. परंतु हे पंचनामे शेतकऱ्यांचे वेळेवर होत नाही तसेच पंचनामे प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानही लवकर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी खूप मोठी प्रतीक्षा पाहावी लागते. या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य-शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता ई पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे होणार असून नुकसान भरपाई अति जलद गतीने वितरित होणार आहे.

शेतकऱ्यांना आता मिळणार तात्काळ मदत

शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले असून आता शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नासाडीची पंचनामे तात्काळ करण्यात येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई वेळेत मिळेल. शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या मालाचे पंचनामे करण्यासाठी तसेच सर्वेक्षण
करण्यासाठी आता उपग्रह आणि ड्रोन ची मदत घेण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची माहिती शासनाकडे तात्काळ पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत वितरित करता येणार आहे.

येत्या जून महिन्यापासून ई – पंचनामे

शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात येतात परंतु त्यामुळे त्या पंचनाम्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये व तसेच शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने येथे जून पासून ई– पंचनामे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असल्याची महत्त्वाची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती व त्यामध्ये या महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेले आहे.

या पंचनाम्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने तसेच मोबाईल APP द्वारे तसेच ड्रोन चा आधार घेऊन करण्यात येणार असून ऑनलाइन पद्धतीने पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही आणि तसेच नुकसान भरपाई वितरणाच्या प्रक्रियेचा वेग नक्कीच वाढेल. त्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर आहे.

शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :

शेतकरी मित्रांनो गेल्या चार ते पाच वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून दरवर्षी अवकाळी पाऊस तसेच गारपीट , तुफानी वादळ यामुळे तसेच अतिवृष्टी आणि सततच्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते . त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा असते.

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading