सरकार देत आहे व्यवसाय करायला १० लाख रुपया-पर्यंत मुद्रा लोन; त्वरित असा करा अर्ज MUDRA LOAN YOJANA

Mudra Loan Yojana
mudra loan yojana

व्यवसाय करण्यासाठी आता प्रत्येक तरुणांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. तसेच अनेक तरुणांना लहान-मोठा बिजनेस करण्याची इच्छा असते परंतु जवळ भांडवल नसल्याने ते स्वतः बिजनेस करू शकत नाहीत.

यामुळे अनेक तरुण चुकीच्या मार्गाने जाताना दिसतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे, आज आपण त्याबद्दल या लेखामधून महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.लेख आवडला तर पुढे नक्की शेअर करा.

महाराष्ट्रातील तरुणांसाठी शासनाने एक व्यवसाय जाहीर केला असून हा व्यवसाय अगदी घरबसल्या देखील
करता येणे शक्य आहे. कि ज्यामध्ये अत्यंत कमी गुंतवणूक असून तरुण घरबसल्या पैसे कमवू शकतो. तसेच या व्यवसायाला बाजारपेठेत खूप मोठी मागणी आहे.

डिस्पोजेबल कप असे या व्यवसायाचे नाव असून तस पाहिलं तर आज काल कागदाच्या कपची मागणी सगळीकडे  खूप जास्त वाढली आहे.अनेक लग्न समारंभात , विविध कार्यक्रमात तसेच घरातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये या डिस्पोजेबल कपचा वापर मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासना कडूनही मोठी मदत मिळत आहे.भारत सरकार हे प्रदूषणच्या प्रमाणाचा विचारत करत असून अनेक नव-नवीन उपाययोजना राबवत असते. ज्यामुळे दुकानात सुद्धा अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी कागदाच्या पिशव्या ग्राहकांना वापरण्यास मिळू लागल्या.

विशिष्ट प्रकारच्या कागदापासून ग्लासं व कफ बनविण्याच्या व्यवसायाला पेपर कप बनविण्याचा
व्यवसाय म्हंटले जाते. तसेच अनेक वेगवेगळ्या आकाराचे ग्लासेस या व्यवसायामध्ये विशिष्ठ पद्धतीने बनवले जातात. अशा कागदाच्या उत्पादनामुळे बनलेल्या वस्तूंची विल्हेवाटही लावण्यास अडचण येत नाही आणि त्याची कोणत्याच प्रकारची हानी पर्यावरणाला होत नाही.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र-शासन मदत करत आहे. मुद्रा लोन मार्फत तरुणांना मदत होत आहे तसेच सरकार मुद्रा कर्जा-अंतर्गत सरकार व्याजावर सबसिडी देते. मात्रव्यवसायामध्ये 25% रक्कम स्वतः गुंतवल्याशिवाय सरकारकडून घेतलेल्या मुद्रा कर्जाची सबसिडी मिळत नाही. 25% रक्कम गुंतवल्यानंतरच सरकार मुद्रा योजनेअंतर्गत 5 टक्के कर्ज देते.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी केवळ 500 चौरस-फूट क्षेत्रफळ जागा असणे आवश्यक
आहे. तसेच मशीन  उपकरणे, शुल्क उपकरणे, फर्निचर, रंग, विद्युतीकरण या सर्वांची रक्कम  मिळून दहा लाख ५० हजार इतका खर्च अपेक्षित आहे.त्यात काही छोटी-मोठी यंत्रेही बसवावी लागतात. ज्यामध्ये लहान व मोठ्या
आकाराचे कप बनवता येतात. सिंगल साइज पेपरकप ग्लास बनवण्याचे मशीन एक ते दीड लाख रुपयांना सहज मिळते. ज्याच्या  मदतीने उत्पादन सुरू करता येते.दिल्ली, हैदराबाद, आग्रा आणि अहमदाबाद यांसह अनेक शहरांमध्ये या मशीन्स  उपलब्ध आहे.

कच्च्या मालापासून कप तयार करण्यासाठी, कागदी रीळ जी लागते ती 90 रुपये प्रति किलो मिळते. यासोबतच खालची रीळ लागते जी 80 रुपये प्रति किलोच्या भावात मिळते.

मुद्रा कर्ज (लोन) योजनेचे फायदे: Mudra Loan Yojana

  • क्रेडिट लाईनच्या विस्तारासाठी सूक्ष्म व लहान नफा कमवून देणारे उद्योग हे मुख्य लक्ष्य असतात.
  • मुद्रालोनचा लाभ घेण्यासाठी कर्जदारांना कोणतेही तारण अथवा सुरक्षा देण्याची गरज नसते.
  • कर्ज प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

मुद्रा कर्ज घेण्याची प्रक्रिया  Mudra Loan Yojana

प्रधानमंत्री मुद्रा (PMEGP) योजने अंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी तसेच बँकेच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करायचा आहे. त्यामध्ये घराच्या मालकीची किंवा भाडे-कराराची कागदपत्रे, कामाशी
संबंधित माहिती, पॅन आधार क्रमांक आणि इतर अनेक कागदपत्रे आवश्यक आहेत.

अर्ज करण्यासाठी लिंक Mudra Loan

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading