free cycle yojana ८ वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल शासन निर्णय जाहीर

Free Cycle Yojana
Free Cycle Yojana

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या पोस्टमध्ये ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती तालुका लेव्हल येथून मोफत सायकल योजना सुरु झालेली आहे,सदरची योजना ही शाळेतील मुलींसाठी आहे महाराष्ट्र राज्य सरकार दरवर्षी शेतकरी , शालेय विद्यार्थी यासाठी दरवर्षी अनेक वेगवेवेळ्या योजना राबवत असते , आज ही योजना खासकरून शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत . ही पोस्ट आवडल्यास पुढे नक्की शेअर करा.

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शाळेमध्ये  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असून त्या योजनांपैकी ही  एक योजना जिचे नाव मोफत सायकल  योजना आहे.या योजनेच्या अंतर्गत राज्यातील अतिदुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अतिमहत्वाची आर्थिक मदत  केली जाते.

मोफत सायकल वाटप योजना ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र राज्यामध्ये अति दुर्गम भाग भरपु आहेत, जेथे सुयोग्य रस्ते नाहीत आणि वाहतुकीची साधने नाहीत अशा भागात विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी तसेच शाळेतून घरी परत येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, त्यांना उन्हातून मैलो न मैल पायी चालत जावे लागते त्यामुळे त्यांना शाळेत जायला व परत जाण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो त्यामुळे पुष्कळ विद्यार्थी आपले शालेय शिक्षणही मधूनच सोडून देतात आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. राज्यातील ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा पुष्कळ अशी कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखाली असून आपले जीवन जगत असतात त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या आर्थीक गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात आणि त्यामुळे आपल्या मुलांना सायकल घेण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसेही नसतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ज्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे घर व शाळा या-मधील किमान अंतर ५ किलोमीटर असेल अशा शालेय मुलींसाठी सायकल खरेदीसाठी आर्थिक सहायता करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य-सरकारच्या वतीने राज्यभरातील एकूण 23 जिल्ह्यातील 125 अति मागास तालुक्यातील 8 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे, त्या-बद्दलचा शासन-निर्णय (GR) फेब्रुवारी २०२२
मध्ये जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयात तब्बल प्रत्येकी एकूण ३,००० रु. एवढे अनुदान देण्यात आले होते परंतु शिंदे आणि फडणवीस सरकारने यात मध्ये वाढ केली असून या अनुदानाची रक्कम ५००० रुपये एवढी करण्यात आली आहे.

तसेच या अनुदानाची रक्कम ही थेटमुलींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत, जर तुम्हाला
सुद्धा योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर यासाठी पात्रता आणि अटी काय आहेत, हे आपण
सुरुवातीला जाणून घेणार आहेत आणि आपणास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे असून त्यामध्ये मोफत सायकल अनुदानासाठी अर्ज करायचा आहे.

 या योजनेसाठी लागणाऱ्या अटी व शर्ती

 • अर्जदार ही मुलगी असावी.
 • मुलगी ही इयत्ता आठवी ते बारावी या वर्गातून  शिक्षण घेणारी असली पाहिजे.
 • घरापासून तिच्या शाळेचे अंतर कमीत-कमी पाच किलोमीटर पर्यंत असावे.
 • मुलगी ही शासकीय, जिल्हा परिषद, शासकीय अनुदानित किंवा शासकीय आश्रम
  शाळेमध्ये शिक्षण घेत असावी आणि तेथून रोज जाणे-येणे करत असावी.
या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे
 • स्वतः मुलीचे आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
 • पासपोर्ट साईज फोटो
 • रहिवाशी प्रमाणपत्र
 • सायकल खरेदी पावती
 
अनुदान टप्पे :
 • पहिल्या टप्प्यात गरजू मुलींसाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत  3000 हजार रुपये रक्कम जमा केली जाते .तसेच दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यावर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित 1500 रुपये इतके अनुदान खात्यावर जमा करण्यात येते.

इच्छुक व पात्र विद्यार्थिनीने आपल्या शाळेतील प्राचार्य यांच्याशी संपर्क करून आपला अर्ज सादर करू शकता.

जी आर पहण्यासाठी येथे क्लिक करा 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading